Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'सिम्पल आहे ना?' लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर

'सिम्पल आहे ना?' लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर मुंबई म्हणजे मायानगरी... मुंबई कधीच झोपत नाही आणि हे अगदीच खरे आहे. याच जादुई दुनियेची रात्रीची सफर घडवणारा 'सिम्पल आहे ना?' ही धमाल वेबसिरीज प्लॅनेट ओटीटीवर लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या वेबसिरीजचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून सिद्धार्थ खिरीद ,आयुषी भावे टिळक आणि सिद्धार्थ आखाडे प्रमुख भूमिकेत आहेत. जेएमएफ मुव्हीज प्रस्तुत, डॉ. राजकुमार एम कोल्हे, डॉ. प्रेरणा राजकुमार कोल्हे निर्मित या वेबसिरीजचे दिग्दर्शन जान्हवी राजकुमार कोल्हे यांनी केले असून 'सिम्पल आहे ना?' चे लेखन सिद्धार्थ आखाडे यांचे आहे. ही वेबसिरीज येत्या १ मे रोजी प्रदर्शित होईल. ट्रेलरमध्ये दोन अनोळखी व्यक्तींची शेवटची ट्रेन मिस झाल्याचे दिसत असून इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी झालेली त्यांची रोलरकोस्टर राईड यात पाहायला मिळणार आहे. त्यांचा हा रात्रीचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाणार हे वेबसिरीज पाहिल्यावरच कळेल. दरम्यान, यात धमाल, इमोशन्स, मैत्री, प्रेम हे सगळंच पाहायला मिळणार असून ही वेबसिरीज म्हणजे मनोरंजनाचे एक कमाल पॅकेज आहे.
वेबसिरीजच्या दिग्दर्शिका जान्हवी राजकुमार कोल्हे म्हणतात, " ही एक मजेशीर वेबसिरीज आहे. जो संपूर्ण कुटुंबासोबत एकत्र पाहाता येईल. शेवटची ट्रेन सुटल्यानंतर दोन वेगळ्या दिशेला राहाणारे प्रवासी जेव्हा एकत्र येतात. तेव्हा काय तारांबळ उडते. विषय खूपच सिम्पल आहे, परंतु अनोख्या पद्धतीने तो यात मांडण्यात आला आहे. ही वेबसिरीज नक्कीच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होईल.'' प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "प्लॅनेट मराठी प्रेक्षकांसाठी नेहमीच काहीतरी हटके घेऊन येत असते. ही वेबसिरीजही अशीच वेगळी आहे. मुंबईमध्ये लोकल मिस होणे, हे काही नवीन नाही. परंतु लोकल मिस झाल्यानंतर पुढे काय होते, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मुंबईची नाईट लाईफ, थोड्या थोड्या अंतरावर भेटणारी माणसे, काही चांगली, काही वाईट. त्यांचे अनुभव... आणि आले डेस्टिनेशन असा हा प्रवास आहे, आता हा रंजक प्रवास 'सिम्पल आहे ना?' मध्ये अनुभवायला मिळणार आहे.''

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.