Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*‘रात के ढाई बजे’ गाण्यातील प्रियांका चोप्राच्या लूकशी साधर्म्य असलेला नेहा हरसोराचा मराठमोळ्या नववधूचा लूक!*

*‘रात के ढाई बजे’ गाण्यातील प्रियांका चोप्राच्या लूकशी साधर्म्य असलेला नेहा हरसोराचा मराठमोळ्या नववधूचा लूक!* _प्रियांका चोप्राच्या लूकशी साधर्म्य असलेल्या आपल्या, लग्नसोहळ्यातील लूकबद्दल सांगत आहे ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘उडने की आशा’ या मालिकेत सायलीची भूमिका करणारी नेहा हरसोरा_ प्रेक्षकांसमोर दर्जेदार मालिका सादर करण्याची परंपरा सुरू ठेवत, ‘स्टार प्लस’ वाहिनीने आजवर स्पर्श न केलेल्या आणखी एका विषयाला हात घातला आहे आणि ‘उडने की आशा’ ही नवी मालिका पेश केली आहे. या मालिकेत कंवर ढिल्लन (सचिन) आणि नेहा हरसोरा (सायली) यांनी प्रमुख भूमिका वठवल्या असून सचिन आणि सायली यांच्या प्रेमाची गाथा आणि नातेसंबंधांची गुंतागुंत या मालिकेतून सादर केली जात आहे. या मालिकेला मराठमोळी पार्श्वभूमी लाभली आहे. ‘स्टार प्लस’ वाहिनीवर सादर होणाऱ्या ‘उडने की आशा’ या मालिकेत एका पत्नीच्या भावभावनांच्या कल्लोळाचे चित्रण करण्यात आले आहे. ती तिच्या बेफिकीर पतीचे रूपांतर जबाबदार व्यक्तीत कसे करते आणि याचा काही प्रमाणात संपूर्ण कुटुंबावर कसा परिणाम होतो, यावर बेतलेले हे नाट्य प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर खिळवून ठेवत आहे. कंवर ढिल्लन यांनी सचिनची भूमिका साकारली आहे, जो एक टॅक्सी ड्रायव्हर आहे, तर नेहा हरसोराने ‘उडने की आशा’ या मालिकेत सायली या फुलविक्रेतीची भूमिका साकारली आहे. 'उडने की आशा' या शोसाठी निर्मात्यांनी अलीकडेच एक वेधक प्रोमो प्रदर्शित केला आहे, ज्यात प्रेक्षकांना सचिन आणि सायली यांच्या लग्नाची झलक दाखवण्यात आली आहे, जे गुंतागुंतीच्या परिस्थितीत घडते. सचिन आणि सायलीचे लग्न हे एक साधेसुधे मराठमोळे पद्धतीने होणार आहे, ज्यात मोठी नाट्यमयता आणि अनेक वळणे आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्रा प्रसिद्ध बॉलीवूड गाणे ‘रात के ढाई बजे’मध्ये दिसते, तशी नऊवारी साडी सायलीने परिधान केलेली दिसेल आणि यात कुणालाही तिळमात्र शंका नाही, की सायली आणि प्रियांका चोप्रा यांचा लूक अगदी सारखा आहे. सायलीला वधूच्या रूपात पाहणे प्रेक्षकांसाठी खरोखरच एक दृश्यात्मक मेजवानी ठरेल. तिला बघताना आपल्या सर्वांना अभिनेत्री प्रियांका चोप्राची नक्की आठवण होईल. प्रियांकाने या गाण्यातील तिच्या उपस्थितीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, सायली छोट्या पडद्यावरही पुन्हा तीच मोहिनी निर्माण करेल.
*या संदर्भात बोलताना 'स्टार प्लस' वाहिनीवरील ‘उडने की आशा’ या मालिकेतील सायलीने ऊर्फ नेहा हरसोराने सांगितले,* “उडने की आशा’ या मालिकेतील आगामी लग्नसोहळ्यात, प्रेक्षकांना अद्भुत नाट्य बघायला मिळेल. मालिकेतील नाट्य अनेक वळणे घेत असून सचिन आणि सायलीच्या आयुष्याचे दार ठोठावणार आहे. या मालिकेत मी सायली या मराठमोळ्या मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे. मला मराठमोळ्या वधूची व्यक्तिरेखा साकारताना खूप छान वाटले. सायलीच्या लग्नसोहळ्यातील वधूच्या वेषातून अभिनेत्री प्रियांका चोप्राने साकारलेल्या ‘रात के ढाई बजे’ गाण्यातल्या लग्नाच्या वेषाची झलक दिसते आणि आपण त्या आठवणीत रमायला लागतो. ‘रात के ढाई बजे’ या गाण्यातील प्रियांका चोप्रा आणि ‘उडने की आशा’ या मालिकेतील सायली या दोघींनीही नऊवारी साडी परिधान केली आहे. मला लग्नसोहळ्यातील मराठमोळे विधी करताना आनंद वाटला आणि मला लग्नसोहळ्यात केल्या जाणाऱ्या विधींची माहितीही झाली. सचिन आणि सायलीच्या आयुष्यात उलगडत जाणारे नाट्य आणि ते दोघे अनपेक्षित परिस्थितीला कसे सामोरे जातात हे जरूर पाहा." राहुल कुमार तिवारी निर्मित, ‘उडने की आशा’ ‘स्टार प्लस’ वाहिनीवर सोमवार ते रविवार रात्री ९ वाजता प्रसारित होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.