झी मराठीच्या कलाकारांनी जागतिक थिएटर डे निमित्ताने जाग्या केल्या आपल्या नाटकाच्या दिवसाच्या आठवणी
March 26, 2024
0
*झी मराठीच्या कलाकारांनी जागतिक थिएटर डे निमित्ताने जाग्या केल्या आपल्या नाटकाच्या दिवसाच्या आठवणी*
'अप्पी आमची कलेक्टर' मधली शिवानी नाईकने सांगितले, "मी आज जे ही आहे नाटकांमुळेच आहे. 'अप्पी आमची कलेक्टर' ही माझी पहिली मालिका आहे आणि त्या आधी मी नाटकातच काम करायचे. जो काही मी अभिनय शिकले किंवा करतेय ते फक्त नाटकामुळेच. मी ३ ते ४ नाट्य संघाची भाग होती. मी 'नाट्य वाडा' आणि 'नाट्य मल्हार' ह्या संस्थेत काम केलय. एकांकिका आणि दोन अंकी नाटकांमध्ये ही काम केले आहे.
'सारं काही तिच्यासाठी' मधली निशी म्हणजेच दक्षता जोईल म्हणते, " मी साठे विद्यालयाची विद्यार्थिनी आहे आणि नाट्य पर्व मध्ये सहभागी झाली होते. मला शाळेपासूनच उत्सुकता होती. माझे स्टेज वरचे इतके किस्से आहेत म्हणजे मला खूप लागायचे असं छोटं- मोठं खर्चटन नाही तर सरळ खिळा घुसायचा, स्टेपलर पिन टोचायची, लेवल पायावर पडणं ह्यासर्व गोष्टी व्हायच्या. आता ही जेव्हा मी माझ्या मित्र-मेत्रीणींना भेटते तेव्हा माझ्या जखमांचे किस्से उलगडले जातात. माझी एक एकांकिका जी माझ्या आयुष्यातलं टर्निंग पॉईंट होती तीच नाव 'भूमी' जी मी तेरावीत असताना केली ज्यात मी मुख्य भूमिकेत होती. मला नाटकातून भाषेच खूप ज्ञान मिळालं. खूप आभारी आहे मी त्यादिवसांची नाटकांनी खूप काही शिकवले आहे."
‘नवरी मिळे हिटलरला’ ची वल्लरी विराजने सांगितले, " M L डहाणूकर कॉलेजला होते तेव्हा मी ५ वर्ष थिएटर केलं. आमच्या संघाचं नाव होतं थिएटर मॅजिक आणि मला ऍक्टिंगची आवड ही थिएटर करताना लागली. मी अगदी प्रॉपर्टी, कॉस्ट्यूम इथून सुरवात केली होती मग हळू हळू एका डायलॉग चा रोल मिळाला, मग तो वाढला, मुख्य भूमिका मिळायला लागल्या. ज्या नाटकांमध्ये मी काम केलं त्यांच्या पैकी काहींची नाव सांगू इच्छिते 'बिटवीन द लाईन्स' एक हिंदी नाटक होतं 'लौट आओ गौरी', 'पॉईंट ब्ल्यांक म्हणून नाटक होतं ज्यासाठी मला बलराज साहनी पुरस्कार मिळाला होता. नाटकांमध्ये काम करता करता ठरवले की मला अभिनेत्री बनायचे आहे. थिएटरने मला खूप काही शिकवले सगळ्यात महत्वाचं टीम वर्क शिकवले फक्त एका कलाकारावर सर्व अवलंबून नसत पूर्ण टीम तितकीच महत्वाची असते आणि प्रत्येक जणांनी आपलं काम चोख केलं तरच काम उत्तम होतं.
'पुन्हा कर्तव्य आहे' ची वसुंधरा म्हणजेच अक्षया हिंदाळकरने सांगितले. " साधना ईश्वर नावाचा एक थिएटर ग्रुप होता तिथे मी सहभागी झाले होते. माझे गुरु होते मिलिंद पेडणेकर ज्यांनी 'गोल पिठा' सारखी मोठी नाटक दिली. त्यांच्याकडे मी सहा वर्ष थिएटर केलं आहे. माझा नाटकांचा अनुभव मला खूप उपयोगी होतो जेव्हा इमोशनल सीन्स असतात किंवा काही कठीण सीन्स असतात. माझं मिलिंद गुरुजी सोबतच शेवटच नाटक होतं 'ती तशीच होती' हे व्यावसायिक नाटक होतं खूप भारी अनुभव होता माझा. थिएटर नकळत आपल्याला खूप काही शिकवून जातं आणि नाटक माझा पाया आहे अभिनयाच्या करिअरचा. मी खूप भाग्यवान आहे की माझ्या अभिनयाची सुरवात नाटकातून झाली."