झी मराठीच्या नायिकांनी नारी शक्तीचा अर्थ त्यांच्या नजरेतून व्यक्त केला*
March 06, 2024
0
*झी मराठीच्या नायिकांनी नारी शक्तीचा अर्थ त्यांच्या नजरेतून व्यक्त केला*
आजची स्त्री ही स्वावलंबी आणि स्वतंत्र आहे. घर आणि समाजाच्या भल्यासाठी स्त्री-पुरुष दोघांचेही समान योगदान आहे, हे स्वीकारले पाहिजे. एक स्त्री जगात जीवन आणते. प्रत्येक स्त्री खास असते, मग ती घरात असो किंवा ऑफिसमध्ये. आज वुमेन्स डे च्या निमित्ताने झी मराठीच्या नायिकांनी नारी शक्तीचा अर्थ त्यांच्या नजरेतून व्यक्त केला आणि त्यांच्या आयुष्यातली सुपर वुमन कोण आहे ते सांगितले.
*'नवरी मिळे हिटलरला' ह्या मालिकेतली वल्लरी विराजने सांगितले*, " माझ्यासाठी नारी शक्तीचा अर्थ म्हणजे, ती स्त्री जी स्वतःच्या आयुष्याचं नियंत्रण स्वतःच्या हातात घेते, स्वतःचे ध्येय स्वतः ठरवते, स्वावलंबी असते, ती तिच्या इच्छे विरुद्ध कधी कधीच वागत नाही ह्याच गोष्टींना मी नारी शक्ती म्हणीन. जेव्हा आपल्या सोबत असणाऱ्या स्त्रिया ही एका स्त्रीला यशस्वी होण्यासाठी आधार देतात त्याला ही नारी शक्ती म्हणतात. माझ्या आयुष्यातली सुपर आणि वंडर वुमन माझी आई आहे. मी आणि माझा भाऊ लहान असताना माझी आई नोकरी करत होती आणि नोकरी करून तिने आम्हाला दोघांना आणि घराला इतक्या सुंदरपणे सांभाळले आहे. तिने कधी घरच्या जबाबदारीसाठी नोकरी सोडली नाही आणि तिची आवड जोपासताना तिने कधी आम्हाला काही कमी पडू दिले नाही.
आईने मला माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहेमी प्रोत्साहित केलाय. आता ही मी जेव्हा 'नवरी मिळे हिटलरला' साठी शूट करत आहे तेव्हा माझा पेट ग्रूमिंग सलूनचा व्यायसाय ती सांभाळत आहे म्हणून माझ्यासाठी माझी आई खूप प्रेरणादायी आहे. हा एक दिवस आपण नारी दिवस म्हणून साजरा करतो लक्षात ठेवायला की आपण स्त्रियांचा आदर केला पाहिजे, त्यांना सपोर्ट आणि सक्षम केलं पाहिजे आणि हे आठवण करून देण्यासाठी हा एक दिवस आहे. पण बदल घडवायचा असेल तर एका दिवसाने काही होणार नाही. फक्त एक दिवस एकामेकांना हॅपी वुमन्स डे बोलून काही होणार नाही आणि हे फक्त पुरुषांसाठी नाही स्त्रियांसाठी ही आहे."
*'पुन्हा कर्तव्य आहे' ह्या मालिकेत वसुंधराची भूमिका साकारत असलेली अक्षया हिंदळकर म्हणते*, "स्त्री ह्या शब्दा मध्ये खूप काही गोष्टी सामावल्या आहेत.असं म्हणतात की स्त्री ही एक अद्भुत रचना आहे. आज महिला जगात वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि घर सांभाळून त्या ह्या गोष्टी करतात. ह्यातच एक मोठी उपलब्धी आहे. शेवटी नारी शक्ती मध्येच सगळं सामावून जातं आपण कधी पुरुष शक्ती म्हणत नाही. माझ्या जीवनातल्या सुपर वुमन माझी आजी, आई आणि बहीण आहेत. त्यामाझ्या पाठीशी आहेत म्हणून मी इथवर पोहचली आहे. माझी आई नेहमी म्हणते की एखाद्या गोष्टीतला वेळ लागतो पण शेवटी सगळं छान होऊन जातं.
ह्या वर्षी माझ्यासाठी वुमन्स डे अजून खास झालाय कारण मी माझ्या नवीन मालिकेत म्हणजे 'पुन्हा कर्तव्य आहे' मध्ये एका आईची भूमिका साकारत आहे. मी महिलांना हेच सांगेन की तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा पण स्वतःशी खऱ्या रहा. तुमच्या सारखं कोणीही नाही हीच तुमची शक्ती आहे. नारी शक्ती मध्ये नव निर्मितीची क्षमता आहे."
*'सारं काही तिच्यासाठी' मध्ये निशीची भूमिका साकारत असलेली दक्षता जोईल ने सांगितले*, "स्त्री ही एकाच वेळी खूप जवाबदाऱ्या निभावत असते आणि त्या जवाबदाऱ्या निभावून पण ती आपल्या आनंदला वेळ देते स्वतःशी प्रामाणिकपणे राहण्यामध्ये स्त्री शक्ती आहे. लहानपणापासून मी माझ्या आईलाच सुपर वूमन मानते कारण काही नसतांना शून्यातून सगळं उभं करणं हे मी माझ्या आईकडून शिकली आहे. माझं असं ठाम मत आहे की स्पेशल डे ठेवण्यापेक्षा तीनशेपासष्ठ दिवस स्त्री पुरुष सामान वागले, तर सगळं खूपच व्यवस्थित होईल. असं कधी भविष्यात झालं तर खऱ्या अर्थाने नारीशक्ती किंवा स्त्रीपुरुष समानता ह्या शब्दांना खरंच अर्थ येईल."
*'पारू' मालिकेतली पारू म्हणजेच शरयू सोनावणे ने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं*, "नारीशक्ती हा शब्दच खूप शक्तिशाली व प्रेरणा देणारा आहे. आताच्या काळात ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला जास्त दिसून येतो कारण स्त्रिया आधी पेक्षा खूप जास्त प्रगती करत आहे. आधीच्या काळात स्त्रियांवर व त्यांच्या निर्णयांवर दुर्लक्ष केले जायचे. कसलीही सूट नसायची, आजही काही ठिकाणी स्त्रियांना अशीच वागणूक मिळत आहे. पण तरीही स्त्रिया आपल्या अधिकारासाठी लढतायत. स्त्री सगळ्याक्ष्रेत्रात पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहे. माझी जिवलग मैत्रीण व सुपर वूमन म्हणजे माझी आई आहे. माझ्या सगळ्यागोष्टी मी तिच्याशी शेअर करते. माझी आई माझ्या सगळ्या गोष्टी ऐकून घेते.
तिने आज पर्यंत ज्या गोष्टी केल्या आहेत त्या खूप प्रेरणा देणाऱ्या आहेत. माझं असं मत आहे की वूमेन्स डे साजरा करायला कुठला ही एक दिवस नसला पाहिजे. आयुष्यातल्या प्रत्येक पावलांवर स्त्री खूप वेगवेगळ्या आव्हानाला सामोरीजाते. बाळाला जन्म देणे, घर आणि संसार सांभाळणे, स्वतंत्रपणे व्यवसाय व नोकरी करणे, ह्या सगळ्यात ती स्वतःला खुश ठेवणे विसरून जाते व तिच्या भावना ती मनात दाबून ठेवते म्हणून मला असे वाटते की स्त्रीला रोजच्या जीवनात प्रेरणा व सम्मान द्यावा व तिची काळजी घ्यावी."
*'शिवा' ह्या मालिकेतली शिवा म्हणजेच पूर्वा कौशिक म्हणते*, "नारी शक्तीचा अर्थ माझ्यासाठी असा आहे की स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा सहनशक्ती खूप जास्त असते. दुसरी गोस्ट म्हणजे आताच्या स्त्रिया स्वावलंबी झाल्यामुळे त्यांच्यावर कोणाचा पगडा नसावा व त्यांनी स्वाभिमानाने आपले काम करत राहावे असा मी संदेश देऊ इच्छिते. मी कधी विचार नाही केला पण माझ्या आयुष्यात अश्या दोन सुपरवूमन आहेत ज्यांच्या बद्दल मी अगदी प्रेमाने सांगेन त्या म्हणजे माझ्या सासूबाई आणि वाहिनी. कारण दोघीजणी खूप शिस्तशीर, स्वावलंबी आहेत. नेहमी त्यांच्याकडून काही न काही गुण घेण्याचे माझे प्रयत्न असतात आणि आयुष्यातला महत्वाचा क्षणी त्यांची शिकवण नेहमी कामी येते. मला असे वाटते की असा वेगळा विशेष दिवस असणे गरजेचे नाही कारण प्रत्येक व्यक्ती मग ती स्त्री असुदे किंवा पुरुष, ज्याच्या त्याच्या प्रमाणे आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम्सला सामोरी जातात. मग आपण आपल्या रोजच्या आयुष्यात एकदुसऱ्याची प्रशंसा का करत नाही?
*खुशबू तावडे म्हणजे 'सारं काही तिच्यासाठीची' उमाने सांगितले*, "नारी शक्ती ही प्रत्येक स्त्री किंवा पुरुष दोघांमध्ये असते आणि प्रत्येकजण त्याचा वापर कमी जास्त प्रमाणात करत असतो. ह्याच शक्तीवर हे जग सुरु आहे. मी बरेच वर्ष वेगवेगळ्या अर्थाने माझ्या आयुष्यातल्या स्त्रियांना सुपर वुमन मानत आली आहे. माझ्या आई आणि बहिणीला मी नेहमी मानतेच पण ह्या वेळी पस्तीस वर्षाच्या खुशबूला म्हणजे स्वतःला सुपर वुमनचा खिताब द्यायचा आहे.
ह्याच कारण म्हणजे ती खूप कमाल व स्वतःच्या अटींवर जगली आहे, तिला हवे ते स्वप्न तिने पूर्ण केली आहेत. तिने करिअर घडवलं, तिने संसार उभा केला, तिला एक मूल आहे, ती सगळ्यांची मन जपते, खूप छान काम करते आणि एक स्वावलंबी स्त्री आहे जी खूप खुश आहे. ज्या स्त्रिया खुश व यशस्वी आहेत त्या नेहमी माझ्यासाठी सुपर वुमन असतात. आपल्या रोजच्या आयुष्यात स्त्रियांचा सम्मान झालाच पाहिजे तिच्या विचारांना प्रोत्साहित केले पाहिजे, घरगुती हिंसा नाही झाली पाहिजे व तिचा आदर केला पाहिजे. माझे असे मत आहे की एक दिवस असा स्पेशल असलाच पाहिजे कारण त्याच्यावर विचार मांडले जातात व अनुभव सांगितला जातो त्याच्यामुळे लोकांच्या विचारात प्रकाश पडतो आणि खूप साऱ्या गोष्टीं बद्दल ज्ञान मिळते.