Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भारत सरकार यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या ९व्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत महाराष्टातून "ऱ्हास" ची निवड*

*राष्ट्रीय मानव अधिकार आयोग (NHRC), दिल्ली,भारत सरकार यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या ९व्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत महाराष्टातून "ऱ्हास" ची निवड* *रशीद निंबाळकर लिखीत, दिग्दर्शित "ऱ्हास" या मराठी लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर* *भारतातील एकुण १३९  लघुपटातून "ऱ्हास" या एकमेव लघुपटाची महाराष्ट्रातून निवड* राष्ट्रीय मानवअधिकार आयोग (NHRC), दिल्ली,भारत सरकार यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या ९व्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अग्निपंख प्रॉडक्शनच्या गिरीश यशवंत गवळी निर्मित, रशीद निंबाळकर लिखीत, दिग्दर्शित "ऱ्हास" या मराठी लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतातील एकुण १३९  लघुपटातून "ऱ्हास" या एकमेव लघुपटाची महाराष्ट्रातून निवड झाली आहे.   आधुनिक भारतात आजही भटक्या समाजात काही प्रथा ह्या रुढी व परंपरेनुसार मजबुरीने पाळाव्या लागतात.आयुष्यभर फिरस्ती करून,पारंपारिक कला सादर करून पोट भरुन जीवन जगणाऱ्या काही भटक्या समाजावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ह्या जगात त्यांच्या शेकडो वर्षांच्या पारंपारीक कला या हळूहळू ऱ्हास पावत आहेत.याच विषयावर "ऱ्हास" हा लघुपट आपल्या मनाला भिडतो आणि विचार करायला भाग पाडतो.
याआधी रशीद निंबाळकर यांना बाराव्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात  'इरगाल' चित्रपटाला बेस्ट फिल्म ज्युरी अॅवॉर्डने देखील सन्मानित करण्यात आले होते. महोत्सवातील ७१८ चित्रपटांतून "इरगाल" चित्रपटाला हा पुरस्कार होता. महाराष्ट्रातील मरीआईवाले या दुर्लक्षित जमातीवर हा चित्रपट भाष्य करणारा होता. परमेश्वर जाधव, उषा निंबाळकर व दीदी निंबाळकर यांनी या लघुपटात काम केले आहे. रशीद निंबाळकर यांनीच कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून   दामोदर पवार ,अभि शिंदे यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.