*पारू अहिल्या समोर दिशाच सत्य आणू शकेल ?*
March 17, 2024
0
*पारू अहिल्या समोर दिशाच सत्य आणू शकेल ?*
'पारू' मालिका प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसत आहे. प्रेक्षकांची उत्सुकता दिवसोदिवस वाढवत आहे. पारूचा साधेपणा त्यांचं मन जिकंत आहे. किर्लोस्करांकडे किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीची तिमाही मीटिंग आहे, ज्यात काही फॉरेन डेलिगेट्स आले आहेत. त्या पाहुण्यांची जबाबदारी अहिल्यादेवींनी दिशा वर दिली आहे. त्यांच्या पाहुणचाराची जबाबदारी ही दिशावरच आहे. पण दिशा ही चलाखीने सगळ्या अनोळखी पदार्थांची यादी पारूला देते. पारू साग्रसंगीत आपल्या मातीतलं महाराष्ट्रीयन जेवण बनवते आणि ते जेवण पाहून आदित्य, अहिल्या आणि घरातले सर्व लोकांच्या चेहऱ्याचा रंग उढून जातो. अहिल्याने दिलेल्या मेनू प्रमाणे स्वंयपाक न बनवून पारू चूक केलं कि बरोबर? हे सगळं होत असताना दुसरीकडे प्रीतमला दिशाच्या बॉयफ्रेंड बद्दल समजतं आणि तो आणि पारू तिला अद्दल घडवायचं ठरवतात. पारूला प्रीतमची ही अवस्था बघवत नाहीए म्हणून ती त्याची समजूत घालायला जाते आणि ते आदित्य ऐकतो. आदित्यला गैरसमज होतो की पारू प्रीतमला लग्नाच्या विरुद्ध सल्ला देते आहे.
पारू आणि प्रीतम दिशाचं सत्य अहिल्यासमोर आणू शकतील? काय आहे पारू आणि प्रीतमचा प्लान? तेव्हा पाहायला विसरू नका 'पारू' सोमवार ते शनिवार संध्या ७:३० वा फक्त झी मराठी वाहिनी वर