धर्मरावबाबा आत्राम - दिलों का राजा' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस
March 16, 2024
0
*नक्षलवादापासून सुटका ते राज्याचे कॅबिनेट मंत्री; 'धर्मरावबाबा आत्राम - दिलों का राजा' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस*
*नक्षलवादापासून सुटका करत दुर्गम भागाला आशेचा किरण दाखवणारे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री. धर्मरावबाबा आत्राम यांचा जीवनप्रवास लवकरच येणार मोठ्या पडद्यावर*
नक्षलवादीयांपासून स्वतःची सुटका करत आदिवासी जमातीला आशेचा किरण दाखवणारा एक केंद्रबिंदू म्हणजे श्री.धर्मरावबाबा आत्राम. लवकरच या महान व्यक्तिमत्त्वाची झलक मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरणार आहे. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री. धर्मरावबाबा आत्राम यांची जीवन गाथा लवकरच 'धर्मरावबाबा आत्राम - दिलों का राजा' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज होत आहे. 'एबिना एंटरटेनमेंट'च्या बॅनर अंतर्गत निर्मित हा चित्रपट असणार आहे. नुकताच या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लॉंच सोहळा दिमाखात संपन्न झाला.
'जल,जंगल,जमीन हमारा है और ये जमीन मालीकाना हक़ हमारा अधिकार है", असं ब्रीदवाक्य ऐकायला येत सुरु झालेला 'धर्मरावबाबा आत्राम - दिलों का राजा' या चित्रपटाचा ट्रेलर आशयघन व साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या भव्य चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माती नीतू जोशी यांनी उत्तमरित्या सांभाळली आहे. तर दिग्दर्शक भुषण अरुण चौधरी यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू उत्तमरित्या पेलवली आहे. तर धर्मरावबाबा आत्राम यांची तरुणपणीची भुमिका अभिनेता जितेश मोरे याने साकारली आहे.
नक्षलवाद, तेथील थरार, आदिवासी पाड्यांचा विकास आणि धर्मरावबाबा आत्राम यांचा जीवनप्रवास या चित्रपटातून हुबेहूब मांडण्यात आला आहे. या चित्रपटाबाबत बोलताना धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की,
"मला नवीन जीवन मिळालं. नक्षलवादींपासून सुटका करत मी बाहेर आलो. नदी नाल्याच पाणी प्यायचो. जंगलाबाहेर पडेन की नाही याची शाश्वतीही नव्हती. या सर्व प्रवासाची व संघर्षाची बाजू या चित्रपटातून दाखविण्यात आली आहे".
निर्माती नीतू जोशी यांनी चित्रपटाबाबत म्हटलं की, "हा चित्रपट बनवताना मी बाबांना जवळुन ओळखलं, त्यांच्या संघर्षांना मला समजून घेता आलं, त्यांच्या समाजातील दायित्वाचं आणि योगदानाचा अनुभव घेता आला. या चित्रपटातून नव्या पिढिला चांगला संदेश व उल्लेखनीय कामगिरी करण्यास प्रेरणा नक्की मिळेल. या चित्रपटात, आदिवासी भागातून राज्य मंत्री बनण्यापर्यंतचा बाबांचा प्रवास दाखवला आहे".