*श्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेले शिवगीत शंकर महादेवन ह्यांच्या आवाजात*
March 06, 2024
0
*श्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेले शिवगीत शंकर महादेवन ह्यांच्या आवाजात*
महाशिवरात्री जवळ येत असताना, टाइम्स म्युझिक स्पिरिच्युअल घेऊन येत आहे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, श्री देवेंद्र फडणवीस, यांनी लिहिलेले आणि श्री शंकर महादेवन यांनी संगीतबद्ध केलेले आणि गायलेले नवीन शिवगीत “देवाधी देव”.
ग्रॅमी पुरस्कार विजेते शंकर महादेवन, या गाण्यात त्यांच्या सांगितिक कौशल्याने श्रोत्यांना भक्तीभाव आणि उत्साहाची अनुभूती करून देतील.
गायिका श्रीमती अमृता फडणवीस यांनी गायलेला ध्यानात्मक महामृत्युंजय मंत्र "देवाधी देव" ह्या गाण्याची सखोलता द्विगुणित करतो.
श्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्दबद्ध केलेल्या या गीतला, त्यांच्या मनस्वी आणि भावपूर्ण शब्दांनी भक्तीच्या एका नवीन शिखरावर नेऊन ठेवले आहे, ज्यामुळे भगवान शंकराला खऱ्या अर्थाने वाहिलेली भावसुमनांजलीच ठरते.
"देवाधि देव", आज, 6 मार्च 2024 रोजी प्रदर्शित करून, टाइम्स म्युझिक स्पिरिच्युअलचे जगभरातील भक्तांच्या हृदयाला स्पर्श करण्याचे उद्दिष्ट आहे.
पद्मश्री पुरस्कार विजेते शंकर महादेवन या गाण्याबद्दल आपला उत्साह व्यक्त करत म्हणाले, "देवेंद्रजींनी अतिशय सुंदरपणे लिहिलेले 'देवाधी देव' संगीतबद्ध करणे आणि गाणे हा एक सन्मान आहे. या गाण्यामधून भगवान शिवाचे सर्व गुणधर्म त्यांनी उत्तम प्रकारे विणलेले आहेत ज्यामुळे माझ्यातल्या संगीतकाराला आणि गायकाला त्यातील भक्तीचे पैलू समोर आणण्यासाठी खूप मदत झाली."
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "माझ्या कुटुंबात लहानपणापासून महाशिवरात्री साजरी केली जात आहे. शिवाच्या गुणविशेषांचा आणि शिवपुराणातील कथांचा माझ्यावर तेव्हापासूनच खूप प्रभाव पडला आहे. मी मागील वर्षी प्रवास करत असताना हे गीत अचानक मला सुचले. एक गायिका असल्याने, माझी पत्नी अमृता हिला गाणे म्हणून त्यातील क्षमता लक्षात आली आणि त्यांनी ते शंकरजींसोबत शेअर केले. मला आनंद आहे की शंकरजींनी ते संगीतबद्ध करण्यास सहमती दर्शवली आणि इतके सुंदर गायले ही आहे. अमृता यांनी एक छोटासा भाग गायला आहे याचा मला आनंद आहे.”
श्रीमती. अमृता फडणवीस आपला आनंद व्यक्त करत म्हणाल्या, "'देवाधी देव' हे एक सुंदर गाणे आहे आणि मला आशा आहे की हे गाणे आपल्या भारतातील महाशिवरात्री उत्सवाचा एक भाग नक्कीच होईल."
"देवाधी देव" चा दिव्य अनुनाद अनुभवा आणि स्वतःला शिवभक्तीत मग्न करा.
टाइम्स म्युसिकचे "देवाधी देव"हे गाणे जागतिक स्तरावर सर्व ऑडिओ आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.