Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्टार प्रवाहच्या मुरांबा मालिकेत येणार नवं वळण…

स्टार प्रवाहच्या मुरांबा मालिकेत येणार नवं वळण… अभिनेता आशय कुलकर्णीची होणार धमाकेदार एण्ट्री, तीन वर्षांनंतर आशयचं टेलिव्हिजनवर दमदार पुनरागमन
स्टार प्रवाहच्या मुरांबा मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. अक्षय आणि रमाची जोडी प्रेक्षकांची लाडकी जोडी ठरत आहे. अक्षय आणि रमाच्या या प्रेमाच्या मुरांब्यात रेवा मात्र अडसर ठरतेय. वेगवेगळी कारस्थानं करुन रमा आणि अक्षयला वेगळं करु पहाणाऱ्या रेवाच्या आयुष्यात मात्र आता नवं वादळ येणार आहे. मालिकेत लवकरच रेवाचा नवरा म्हणजेच अथर्वची एण्ट्री होणार आहे. अभिनेता आशय कुलकर्णी रेवाच्या नवऱ्याची म्हणजेच अथर्वची भूमिका साकारणार आहे. मुरांबा या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना आशय म्हणाला, ‘स्टार प्रवाह वाहिनीसोबत काम करण्याची इच्छा होती ती या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण होतेय. जवळपास तीन वर्षांनंतर पुन्हा मालिकेत काम करतोय. मुरांबा मालिकेत मी खलनायक साकारणार आहे. खलनायक साकारताना पात्र एका साच्यात अडकत नाही. त्यामुळे नवनवे प्रयोग करण्याची मुभा असते. हळूहळू मला हे पात्र गवसतं आहे. शशांक केतकरसोबत मी याआधी काम केलं आहे त्यामुळे आमची मैत्री होतीच. इतर कलाकारांसोबतही छान गट्टी जमली आहे. मुरांबा मालिकेच्या सेटवर खेळीमेळीचं वातावरण आहे. त्यामुळे नवं कुटुंब मिळालं आहे असं म्हणता येईल.’
अथर्वच्या येण्याने मालिकेत नेमकं कोणतं नवं नाट्य घडणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल. तेव्हा पाहायला विसरु नका मुरांबा दुपारी १.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.