Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'सन मराठी'च्या 'काँस्टेबल मंजू' मध्ये अभिनेत्री विद्या सावळे आणि तिच्या जुळ्या मुली नेहा आणि निकिता दिसणार एकत्र*

*'सन मराठी'च्या 'काँस्टेबल मंजू' मध्ये अभिनेत्री विद्या सावळे आणि तिच्या जुळ्या मुली नेहा आणि निकिता दिसणार एकत्र* *'सन मराठी'च्या 'काँस्टेबल मंजू' मध्ये झळकणार खऱ्या आयुष्यातील माय आणि जुळ्या लेकींची जोडी* अभिनयाचे बाळकडू जेव्हा घरातूनच मिळतं तेव्हा आपल्या पालकांच्या पावलावर पाऊल ठेवून कलाकारांची मुलं अभिनयाकडे वळतात. लहानपणापासून आपल्या कलाकार आई-वडिलांमध्ये पाहिलेले अभिनय कौशल्य, सोबतीला त्यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन यामुळे मुलांना त्यांच्या अभिनयाच्या प्रवासात एक आत्मविश्वास मिळतो. असाच एक प्रवास सुरू झाला आहे कलाकार मायलेकींचा. कलाकार आई आणि तिच्या दोन जुळ्या मुली अशी ही माय लेकींची जोडी लवकरच मराठी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचणार आहे. 'सन मराठी'वर 'काँस्टेबल मंजू' ही नवीन मालिका येत्या १८ मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री विद्या सावळे आणि त्यांच्या जुळ्या मुली नेहा आणि निकिता 'मम्मीसाहेब' आणि 'सवी- कवी' या भूमिका साकारणार आहेत. आई आणि तिच्या जुळ्या मुली यांना छोट्या पडद्यावर एकत्र पाहण्याचा योग सन मराठीने जुळवून आणला आहे.
अगोदरच 'काँस्टेबल मंजू' मालिकेची इंटरेस्टिंग झलक पाहून मालिकेच्या टीमने प्रेक्षकांची आतुरता वाढवली आहे आणि त्यात आता या मायलेकींची भर... संदीप जाधव निर्मित 'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेचे संवाद तेजपाल वाघ यांनी लिहिले असून स्वप्नील गांगुर्डे यांनी कथा, पटकथा लिहिली आहे. भिन्न स्वभावाची अनोखी प्रेम कहाणी नक्की पाहा येत्या १८ मार्च पासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता फक्त सन मराठी वाहिनीवर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.