सन मराठीवरील 'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेत अनुभवा ‘सत्या आणि बलमामा’ची जिगरी दोस्ती*
March 22, 2024
0
*सन मराठीवरील 'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेत अनुभवा ‘सत्या आणि बलमामा’ची जिगरी दोस्ती*
*ही दोस्ती तुटायची नाय! सन मराठीवरील 'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेतील ‘सत्या आणि बलमामा’ यांची मैत्री जणू करण-अर्जुन, जय-वीरुच.*
आयुष्यात माणसांच्या वाटेला सगळ्या नात्यांचा अनुभव येतो, पण एक नातं असं आहे ज्याच्यासोबतचे क्षण सतत अनुभवावेसे वाटतात आणि ते नातं म्हणजे मैत्रीचं नातं. ज्याला नशिबाने ख-या मैत्रीची साथ लाभली आहे तो खरा श्रीमंत आणि सुखी.
मैत्री म्हंटलं की “ही दोस्ती तुटायची नाय” असं आपसूक सगळ्या वाटलंच पाहिजे. जसं की ‘करण अर्जुन’, ‘राम लखन’, ‘जय वीरु’ ही मित्राची जोडी जशी लोकप्रिय आहे तशीच आता आणखी एक जोडी प्रेक्षकांच्या मनात आणि घरात स्थान निर्माण करणार आहे आणि ती जोडी आहे ‘सत्या आणि बलमामा’ यांची.
‘सन मराठी’ वाहिनीवर १८ मार्चपासून 'कॉन्स्टेबल मंजू' ही नवी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेत भित्री भागुबाई मंजू आणि बिनधास्त, बेधडक सत्या या जोडीची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहेच पण त्याचबरोबर फ्रेण्डशिप गोल सेट करणारी मित्राची जोडी सुध्दा पाहायला मिळणार आहे. सत्या आणि बलमामा हे अगदी जिगरी दोस्त, एकमेंकासाठी दुनियेशी दोन हाथ करणारे मित्र प्रत्येक सीनला काय धमाल करतात हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे.
सत्याला कोणी काही बोललं की त्यांचा थेट कार्यक्रम करण्यासाठी निघालेला बलमामा म्हणजे सर्वांचा लाडका अभिनेता राहुल मगदुम आणि आपला सत्या उर्फ वैभव कदम यांच्या दोस्तीची दुनियादारी अनुभवयाची असेल तर नक्की पाहा 'कॉन्स्टेबल मंजू' सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता फक्त सन मराठी वाहिनीवर.