*प्लॅनेट मराठीने साजरा केला ‘रंगोत्सव’*
March 25, 2024
0
*प्लॅनेट मराठीने साजरा केला ‘रंगोत्सव’*
विको प्रस्तुत, प्लॅनेट मराठी ‘रंगोत्सव’ रंगांची उधळण करत नुकताच जल्लोषात साजरा करण्यात आला.
रंगपंचमीच्या निमित्ताने आजोजिलेल्या या आनंदोत्सवात अभिजीत पानसे, किशोरी शहाणे, अवधूत गुप्ते, श्रृती मराठे, गौरव घाटणेकर, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे, विजय पाटकर, जयंत वाडकर, पुष्कर श्रोत्री, दिग्दर्शक विशाल देवरूखकर, तन्वी मुंडले, विवेक सांगळे, अविनाश दारव्हेकर, सुशांत शेलार, आदिती सारंगधर, मनवा नाईक, सुरभी हांडे, सोनाली खरे, प्रियांका तन्वर, सनाया आनंद, गौरव मोरे यांच्यासह प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि अन्य मान्यवर सहभागी झाले होते.
याबद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बरदापूरकर म्हणतात, " विविध रंगांची उधळण करणारा हा सण खूप उत्साहाने भरलेला आहे आणि म्हणूनच हा सण आम्ही एकत्र साजरा करत आहोत. एरव्ही कामात व्यस्त असणारे हे कलाकार यानिमित्ताने एकत्र येऊन धमाल करतात. मजा, मस्ती आम्ही या रंगोत्सवात करतोय.’’