वसू आणि आकाशची भेट होऊ शकेल?
March 22, 2024
0
*वसू आणि आकाशची भेट होऊ शकेल?*
'पुन्हा कर्तव्य आहे' ह्या नवीन मालिकेने अगदी पहिल्या भागापासून प्रेक्षकांची कुतूहलता / उत्सुकता वाढवली आहे. वसूच्या नर्सरी मध्ये तक्रारीसाठी आलेल्या अखिल ची भेट बनीशी होते. पण बनी त्यांना हाकलून लावतो. अखिल वैतागून आकाशाकडे तक्रार करतो ह्या कारणांनी वसू आणि आकाश समोरासमोर येतात. पण वसूने चेहेऱ्यावर स्कार्फ बांधला असल्याकारणाने आकाश वसूचा चेहेरा बघू शकत नाही.
दोघांमध्ये पहिल्याच भेटीत वाद निर्माण होतात, अशातच वसुसाठी स्थळ आलं आहे. वसूचे सासू सासरे वसूला खोटं सांगून मुलाला भेटायचा प्लॅन करतात. वसुला घेऊन सुधिर आणि सुशिला मॉलमध्ये पोहचतात त्याच वेळेस आकाशही मॉलमध्ये साडी घ्यायला आला आहे. चुकून सुशिला आकाशला तो मुलगा समजते. ह्या झालेल्या गैरसमजातून वसू आणि आकाशमध्ये संभाषण होईल? की ही भेटसुद्धा अपुरीच राहील?
हे सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी पाहायला विसरू नका 'पुन्हा कर्तव्य आहे' दररोज रात्री ९:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.