Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'नवरी मिळे हिटलरला' च्या सेट वर वल्लरी आणि राकेश बापट च्या पहिल्या भेटीचा किस्सा*

*'नवरी मिळे हिटलरला' च्या सेट वर वल्लरी आणि राकेश बापट च्या पहिल्या भेटीचा किस्सा* 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका १८ मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ह्या कार्यक्रमाचा सध्या लीलाचा प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे आणि त्याच निमित्ताने या मालिकेची नायिका वल्लरी विराज हिच्याशी आम्ही साधलेला संवाद. वल्लरीनि आपल्या भूमिका बद्दल सांगितले त्यासोबत प्रोमो शूटचा किस्सा ही ऐकवला. " माझी लीलाच्या भूमिकेसाठी निवड एकदम अनपेक्षित होती. मला फोन आला आणि २ दिवसात तू ऑडिशनला ये असं सांगितले. मी जाऊन ऑडिशन दिली आणि ३-४ दिवसात मला फोन आला की माझी निवड झाली आहे. मला वाटलं होत ऑडिशनचे अधिक राऊंड्स होतील पण ते मला म्हणाले आम्हाला आणि चॅनेलला ही तू लीला म्हणून पसंत आहेस. माझा विश्वास बसत नव्हता की पहिल्याच ऑडिशन मध्ये माझी निवड झाली आहे. लीला बद्दल सांगायचं झालं तर ती बहिर्मुख आहे, तशीच माझ्या मध्ये ही लवकर मित्र-मैत्रिणी बनवण्याची कला आहे. जिथे जाईन तिथे मिसळून जाते. पण मला माझ्या जवळच्या लोकांमध्ये राहायला जास्त आवडत". वल्लरीनि राकेश बापट बरोबरची पहिल्या भेटी बद्दल सांगितले, "माझी पहिली भेट त्यांच्यासोबत एका लुक टेस्टसाठी झाली होती. मला टेन्शन तर होतच कारण लीलाचे खूप डायलॉग आहेत आणि त्यात राकेश बापट तुमच्या समोर आहेत तर प्रेशर तर होतं कारण केमिस्ट्री मॅच झाली तरच लोकांना मालिका पाहायला आवडेल. पण त्यांना जेव्हा भेटले तेव्हा कळलं की ते अतिशय साधे आहेत. आमचं लुक टेस्ट ही छान झालं. लोकांचा प्रतिसाद खूप उत्तम मिळत आहे, म्हणून माझी उत्सुकता अजून वाढली आहे. मला तुम्हाला लीलाच्या प्रोमोचा किस्सा सांगायला अवढेल. लीलाच्या प्रोमो मध्ये तुम्हाला तिच्या बद्दल खूप काही गोष्टी कळतील. मी प्रोमो मध्ये दही हंडी फोडली आहे आणि स्कुटी ही चालवली आहे. स्कुटी तर मला चालवता येते पण माझ्यासाठी आव्हानात्मक गोष्ट म्हणजे दही हंडी फोडणे. सर्वात महत्वाचं सांगायचं तर हंडी फोडताना जे माझी मदत करत आहेत ते खरं गोविंदा पथक आहे. प्रचंड उत्साही माहोल होत प्रोमो शूटच. लीला खूप धांदरट आहे पण तिचा उद्देश चांगला आहे, तिला संगळ्यांची मदत करायची असते. तर जशी लीला आहे तसाच तिचा प्रोमोही रंगतदार आहे. जस अभिराम जहागीरदारला पाहून तुम्हाला कळलं असेल की तो अतिशय शिस्त प्रिय आहे, तसंच लीला मध्ये तुम्हाला एक दिलखुलास-बिंधास्त मुलगी पाहायला मिळेल. लीला आणि अभिरामची इम्परफेक्ट जोडीची परफेक्ट लव्हस्टोरी बघायला विसरू नका 'नवरी मिळे हिटलरला' १८ मार्चपासून दररोज रात्री १० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.