Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्मिता तांबेची प्रमुख भूमिका असलेला 'कासरा' येतोय ३ मे रोजी

स्मिता तांबेची प्रमुख भूमिका असलेला 'कासरा' येतोय ३ मे रोजी रवी नागपूरे निर्मित, विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात
"कासरा" चित्रपटाचे पोस्टर आणि म्युझिक लाँच मोठ्या दिमाखात संपन्न शेतीप्रधान विषयावरील "कासरा" अभिनेत्री स्मिता तांबेनं आजवर अनेक चित्रपटांतून आपल्या दमदार अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. आता ती आगामी "कासरा" या शेतीप्रधान चित्रपटातून महत्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर आणि म्युझिक लाँच मोठ्या दिमाखात संपन्न झाले. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती. येत्या ३ मे रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. रवी नागपूरे यांच्या साई उत्सव फिल्म्सनं "कासरा" चित्रपटाची निर्मिती केली आहे. विकास विलास मिसाळ यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण केले असून त्यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. रवी नागपूरे यांच्याच कथेवर महेंद्र पाटील यांनी पटकथा, संवादलेखन केलं आहे तर अविनाश सातोसकर यांनी छायांकन केले आहे. प्रशांत नाकती यांनी लिहिलेल्या गीतांना प्रशांत नाकती, संकेत गुरव यांनी संगीत दिग्दर्शन केले असून ही गाणी गायक जावेद अली, आदर्श शिंदे गायिका आर्या आंबेकर, सोनाली सोनवणे, मनीष राजगिरे, रविंद्र खोमणे आणि रिषभ साठे यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत. या चित्रपटात अभिनेत्री स्मिता तांबे यांच्यासह अभिनेते गणेश यादव, प्रकाश धोत्रे, राम पवार, डॉ. वंदना पटेल, कुणाल सुमन, देवेंद्र लुटे, विशाल अर्जुन आणि बाल कलाकार साई नागपूरे यांच्या मध्यवर्ती भूमिका असून जनमेजय तेलंग, तन्वी सावंत हे कलाकार या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. विष्णू खापरे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे.
स्मिता तांबेनं आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटांतून सशक्त अभिनय केला आहे. त्याच पठडीत आता "कासरा" चित्रपटातही तिची महत्त्वाची भूमिका आहे. शेतीप्रधान विषयावरील "कासरा" हा चित्रपट अन्नदात्या शेतकऱ्याला वेगळा दृष्टिकोन देणारा आहे. शेतीतील प्रश्न मांडतानाच त्यावर उत्तर देण्याचाही प्रयत्न हा चित्रपट करतो. त्यामुळे स्मिता तांबेसारख्या दमदार अभिनेत्रीच्या अभिनयानं या चित्रपटाचं कथानक वेगळ्या उंचीवर गेलं आहे. कासरा चित्रपट पाहण्यासाठी आता प्रेक्षकांना ३ मे पर्यंतच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.