Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांची दिवाळीची खास भेट - १ नोव्हेंबर २०२४ ला प्रदर्शित होणार भव्यदिव्य संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान"!

*जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांची दिवाळीची खास भेट - १ नोव्हेंबर २०२४ ला प्रदर्शित होणार भव्यदिव्य संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान"!* मराठी संगीत रंगभूमीवरील एक सोन्याचे पान असलेल्या 'संगीत मानापमान' या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला आज ११३ वर्षे पूर्ण होत आहेत. आणि म्हणूनच आजच्या या विशेषदिनी या अजरामर कलाकृतीला आणि सर्व दिग्गजांना वंदन करून जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांनी १ नोव्हेंबर रोजी चित्रपट "संगीत मानापमान" प्रदर्शित करणार असल्याची घोषणा केली आहे. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित "संगीत मानापमान" या नाटकाला आजतागायत रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करण्यात अनेकांचा वाटा आहे. आणि म्हणूनच आजच्या या दिवशी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या कलाकृतीवर प्रेरित, भव्यादिव्य संगीतमय चित्रपट "संगीत मानापमान" यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे जाहीर केले आहे.
या चित्रपटातील प्रमुख भूमिका सुबोध भावे करणार असून त्याचप्रमाणे या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील सुबोध भावे यांनी केले आहे. त्याचबरोबर ‘कट्यार काळजात घुसली‘ तसंच ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर‘ या चित्रपटाची संपूर्ण टीम ह्या नव्या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत आहे. त्यासोबतच प्रसिध्द संगीतकार शंकर- एहसान-लॉय यांचे संगीत या चित्रपटासाठी असणार आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनीत "संगीत मानापमान" हा संगीतमय चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील सर्व सिनेमागृहांत प्रदर्शनास सज्ज होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.