घरातले म्हणतात 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेच्या निमित्ताने तुला बाबा होण्याची ट्रैनिंग मिळतेय. - अक्षय म्हात्रे
March 07, 2024
0
*घरातले म्हणतात 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेच्या निमित्ताने तुला बाबा होण्याची ट्रैनिंग मिळतेय. - अक्षय म्हात्रे*
हिंदी टीव्ही मालिकांमधला चेहरा अक्षय म्हात्रे झी मराठीवर 'पुन्हा कर्तव्य आहे' ह्या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अक्षयच्या भूमिकेचं नाव आहे आकाश ज्याच्या दोन गोड मुली आहेत. सर्वाना वाटतंय की अक्षयचा हा मराठी मालिकेमध्ये डेब्यू आहे पण अक्षयने खुलासा केलाय की त्याच्या अभिनयाची सुरवात मराठी टीव्ही इंडस्ट्री मधूनच झाली होती.मराठी मालिकांशी अक्षयचा असलेलं नातं आणि 'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका मिळाल्याचं आनंद अक्षयनि व्यक्त करताना सांगितले, "११ वर्षापूर्वी माझी मराठी टीव्ही इंडस्ट्री पासून सुरुवात झाली. माझी पहिली मालिका टेल-अ-टेल मीडिया या प्रोडक्शन हाऊस सोबत होती आणि येत असलेली 'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका देखील याच निर्मिती संस्थेची आहे. त्यांनी मला पहिला ब्रेक दिला जेव्हा मी नुकताच कॉलेज पूर्ण करून बाहेर पडलो होतो आणि आता इतक्या वर्षानंतर आम्ही 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेच्या निमित्ताने परत एकत्र आलो आहोत. माझ्या करियरची सुरुवात मराठी मालिकेतून झाली आणि कुठेतरी मनात होतं की परत मराठी मालिकेत काम करायचंय. दुसरं कारण म्हणजे माझे घरचे आणि नातेवाईक जे नेहमी म्हणायचे की मराठी मालिका कर. मी खुश आहे की तो योग आला. लग्नाच्या तयारीसाठी मी ब्रेक घेतला होता तेव्हा मला सरांचा कॉल आला की भेटायला ये. त्यांना भेटलो त्यांनी मला कथानक सांगितले मी ऑडिशन दिली आणि सगळं घडत गेलं. मला असं वाटत की जर मला दोन-तीन भाषा मध्ये काम करायला मिळत असेल तर त्यात माझाच फायदा आहे.
माझ्या पात्राच नाव आहे आकाश आणि खूपच वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका आहे. दोन छोट्या मुलींच्या वडीलांची भूमिका साकारशील का असा प्रश्न मला विचारला गेला होता आणि मी म्हणालो का नाही भूमिका चांगली असेल तर नक्कीच करेन. मी नेहमी अश्या प्रोजेक्ट्सचा भाग राहिलो आहे ज्यात काहीतरी वेगळं करायला मिळतं. मी खऱ्या आयुष्यात अजून बाबा झालो नाहीये पण दोन लहान मुलींचा बाबा होण्याच्या त्या भावना व्यक्त करण्याचं आव्हान एक्सायटिंग आहे माझ्यासाठी. खूप संयम ठेवावं लागत पण मज्जा येते काम करताना. माझ्या रिअल लाईफ मध्ये लहान मुलांना मी खूप आवडतो. माझ्या मित्रांच्या मुलांचा मी आवडता काका आहे कारण त्यांच्यासोबत मी खूप मस्ती करतो. पण शूटवर तसं करू शकत नाही कारण काम ही करायचं असत. माझे घरातले तर बोलतायत की माझी ट्रेनिंग चालू आहे. तुला जेव्हा बाळ होईल ते खूप भाग्यवान असणार कारण त्याच्या बाबाची आधीच मस्त ट्रेनिंग होतं आहे. माझी बायको श्रेनु तर प्रचंड खुश झाली जेव्हा तिला कळलं मी या मालिकेत बाबाची भूमिका साकारत आहे ती म्हणाली छान आहे. तुझी चांगली ट्रेनिंग होईल. कारण तीही तिच्या आधीच्या मालिकेत आईची भूमिका साकारत होती.”
मी प्रेक्षकांना हे नक्कीच सांगेन ह्या मालिकेतील सगळ्याच पात्रांचा तुम्हाला लळा लागेल.
तेव्हा पाहायला विसरू नका जुन्या आठवणींसोबत नव्या नात्याची गोष्ट 'पुन्हा कर्तव्य आहे' १८ मार्चपासून दररोज रात्री ९.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.