रूबल नागी यांची निर्मिती आणि अमीत साटम यांची संकल्पना असलेल्या शिल्पाचे टायगर श्रॉफ यांच्या हस्ते झाले अनावरण
March 03, 2024
0
रूबल नागी यांची निर्मिती आणि अमीत साटम यांची संकल्पना असलेल्या शिल्पाचे टायगर श्रॉफ यांच्या हस्ते झाले अनावरण
मुंबईच्या गजबजलेल्या शहराला नुकतीच एक उल्लेखनीय जोड मिळाली कारण #Andheri(W) या शिल्पाचे अनावरण मुंबईतील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकावरच करण्यात आले . या शिल्पाची संकल्पना अंधेरी पश्चिम मतदारसंघातील आदरणीय आमदार (एम एल ए) अमीत साटम यांची आहे आणि प्रसिद्ध कलाकार, सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका रूबल नागी यांनी या शिल्पाची निर्मिती केली आहे . स्टेशनच्या प्रवेश द्वारावर स्थित असलेले हे शिल्प गेल्या दशकात या परिसराच्या झालेल्या गतिमान विकासाचे हे प्रतीक आहे. या शिल्पकृतीत अंधेरी पश्चिम भागातील गिल्बर्ट हिल, इस्कॉन मंदिर, जुहू बीच, बटरफ्लाय गार्डन, 'I♥मुंबई' सेल्फी पॉइंट यांसारख्या प्रतिष्ठित ठिकाणे यात बारकाईने दाखवली आहेत| अभिनेता टायगर श्रॉफ याने कलाकार रूबल नागी,आमदार अमीत साटम, प्रसिद्ध चित्रपट निर्माते आनंद पंडित आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते अशोक पंडित यांच्या उपस्थितीत #Andheri (W) शिल्पाचे अनावरण केले
हे शिल्प साकारण्यासाठी सुमारे दोन महिने लागलेल्या रूबल नागी याबद्दल म्हणतात,"हे शिल्प साकारणे हे प्रेमाचे काम आहे. अंधेरी पश्चिमेची कहाणी दृश्यात्मक रूपात कथन करणे ही सन्मानाची गोष्ट आहे. कारण अंधेरी हे तीव्र ऊर्जा असलेलं एक सजीव उपनगर म्हणता येईल. " त्या पुढे म्हणाल्या ,"सार्वजनिक कला ही नेहमीच नागरिक, नेते आणि कलाकार यांच्यातील सहकार्याबद्दल असते.हे शिल्प तयार करताना मला आनंद होत आहे . अंधेरी पश्चिमेसाठी एक सेल्फी पॉइंट निर्माण करून या परिसरात भेट देण्याच्या विविध ठिकाणांचे चित्रण करून मी आनंदी आहे. माझा विश्वास आहे की ‘हॅशटॅग’चळवळ लोकांना जवळ आणते आणि त्यांना सार्वजनिक कलेबद्दल शिक्षित करते.
"
अमीत साटम म्हणाले, “मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असल्याने इतर आंतरराष्ट्रीय शहरांच्या तुलनेत खुल्या जागेचे प्रमाण खूपच कमी आहे, त्यामुळे शहरातील मोकळ्या जागांचे संवर्धन आणि विकास करणे महत्त्वाचे आहे.तसेच शहराला जिवंत रूप देण्यासाठी त्याचे सौंदर्यपूर्ण स्वरूप महत्त्वाचे आहे, म्हणूनच आम्ही गोल्डन लोटस, व्हर्टिकल बटरफ्लाय गार्डन, 'I♥मुंबई' सेल्फी पॉइंट आणि #जुहुबिच तयार केले आहेत.आता या यादीला #Andheri(W) या शिल्पाची जोड मिळत आहे आणि जे अंधेरी पश्चिम मध्ये गेल्या 10 वर्षात झालेल्या विकासाचे प्रतीक आहे ."