Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*गौरव मोरेची उडाली घाबरगुंडी*

*गौरव मोरेची उडाली घाबरगुंडी*
आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगने रसिकांना खळखळून हसवणाऱ्या गौरव मोरेची सध्या घाबरगुंडी उडाली आहे. गौरव नेमका कोणाला आणि कशासाठी घाबरला आहे? हा प्रश्न तुम्हाला ही पडला असेल तर आगामी 'अल्याड पल्याड' या मराठी चित्रपटात याचे उत्तर तुम्हाला मिळेल. एस. एम.पी प्रोडक्शन् अंतर्गत ‘अल्याड पल्याड' चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली आहे. आशय आणि सादरीकरणाच्या बाबतीत वेगळेपणा दाखवू पाहणारा प्रीतम एस के पाटील दिग्दर्शित ‘अल्याड पल्याड' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या पोस्टरने आणि उत्कंठावर्धक टिझरने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पोस्टर मध्ये घाबरलेल्या अंदाजात गौरव पाहायला मिळतोय. ‘एका चांगल्या चित्रपटाचा भाग होता आल्याचा आनंद अभिनेता गौरव मोरे ने व्यक्त केला. गौरव मोरे सोबत सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, अनुष्का पिंपुटकर आदी अनुभवी कलाकारांसोबत भाग्यम जैन हा नवा चेहरा या चित्रपटात दिसणार आहे.
आपला महाराष्ट्र हा समृद्धतेने आणि विविधतेने नटलेला आहे. त्यात अनेक जुन्या संस्कृती तसेच प्रथा परंपरा आहेत. अशाच एका वेगळ्या परंपरेची आराधना करण्याची प्रथा असणाऱ्या एका गावाची, तिथल्या माणसांची कथा सांगणारा ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट आहे. चित्रपटाची कथा प्रीतम एस के पाटील यांची असून पटकथा संवाद संजय नवगिरे यांचे आहेत. ‘अल्याड पल्याड' चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी यांचे तर संकलन सौमित्र धरसुलकर यांचे आहे. कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे. कार्यकारी निर्माते संतोष खरात आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.