IMDb च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत पूनम पांडेचे पदार्पण
February 16, 2024
0
IMDb च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत पूनम पांडेचे पदार्पण
सर्व्हायकल कर्करोग आणि HPV लसीबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या वादग्रस्त मोहिमेसाठी चर्चेत असलेली अभिनेत्री पूनम पांडे हिने एका आठवड्यानंतर, IMDb लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत पदार्पण केले. २ फेब्रुवारी रोजी, तिच्या टीमने इंस्टाग्रामवर घोषित केले की ती सर्व्हायकल कर्करोगाने ग्रस्त आहे, ज्यामुळे इंडस्ट्री आणि तिच्या चाहत्यांना धक्का बसला. परंतु नंतर हा एक प्रसिद्धी स्टंट असल्याचे उघड झाले आणि हा स्टंट तिने सर्व्हायकल कर्करोगाचे लवकर निदान आणि त्यावर उपलब्ध असलेल्या लसीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी केला असल्याचे सांगितले. IMDb च्या यादीत पूनम पांडे आठव्या स्थानावर आहे.
या आठवड्याच्या क्रमवारीत तृप्ती दिमरीने पुन्हा एकदा या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे, तर ऐश्वर्या राय बच्चन आणि शाहरुख खान अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत