'शिवा' आणि 'पारू'च्या स्वागतासाठी अश्विनी भावे आणि मृणाल कुलकर्णी सज्ज*
February 06, 2024
0
*‘शिवा’ आणि ‘पारू’ च्या प्रमोशनसाठी जुळून आला दुग्धशर्करा योग!*
*'शिवा' आणि 'पारू'च्या स्वागतासाठी अश्विनी भावे आणि मृणाल कुलकर्णी सज्ज*
झी मराठी १२ फेब्रुवारीपासून आपल्या प्रेक्षकांसाठी २ नव्या मालिका घेऊन येत आहे. दोन नव्या मालिका , दोन नव्या नायिका, दोन नव्या गोष्टी. माणुसकीला जपणारी, आपुलकीने वागणारी, मनसोक्त हसणारी ‘पारू’ म्हणजे जणू झरझरणारा अवखळ झरा.
अशा नटखट, अवखळ पारूची भूमिका साकारणार आहे 'शरयू सोनावणे'. तर दुसरीकडे अन्यायाला भिडणारी, हक्कासाठी लढणारी, बिनधास्त जगणारी, निडर 'शिवा', ही जणू धगधगता पेटता निखारा आणि ह्या निखाऱ्याचं नाव आहे 'पूर्वा कौशिक. तर अशा ह्या दोन भिन्न स्वभाव, दोन नव्या गोष्टी प्रेक्षकांना आपलंस करून घेतील ह्यात शंकाच नाही. जेव्हा दोन नवीन तारका झी मराठीवर आगमन करत आहेत तर त्यांचं मायेनं स्वागत करायला मराठी मनोरंजनसृष्टीतील दोन नावाजलेल्या तारका म्हणजेच ‘अश्विनी भावे’ आणि ‘मृणाल कुलकर्णी’ सज्ज झाल्या आहेत आणि त्यांची साथ देत आहेत झी मराठीच्या लाडक्या नायिका उमा, अक्षरा, नेत्रा आणि अप्पी.
‘पारू’ आणि ‘शिवा’ येतायत तुम्हाला भेटायला १२ फेब्रुवारीपासून 'पारू' सोमवार ते शनिवार,संध्या ७:३० वा. आणि 'शिवा' रात्री ९:०० वा. आपल्या लाडक्या झी मराठीवर!