*“पारूच्या ऑडिशनची कहाणी”*
February 15, 2024
0
*“पारूच्या ऑडिशनची कहाणी”*
'पारू' ची निरागस अदा सगळ्यांच्या मनात कोरली गेली आहे. मग तिचं ते गोड हसणं किंवा नि:स्वार्थपणे लोकांची काळजी घेणं असो. 'पारू' ची भूमिका साकारणारी शरयू सोनावणे ने सांगितली पारूच्या ऑडिशनची कहाणी. “मला कॉल आला होता की पारू नावाची भूमिका आहे ऑडिशनला येऊ शकशील का आणि मी लगेच हो म्हणाले. नंतर मला कळलं की मी शेवटीच मुलगी होती त्या ऑडिशन लिस्ट मधली. ऑडिशनच्या मागची मजेशीर गोष्ट मला सांगयला आवडेल. तुम्ही पारूचा लुक पाहिलाच असेल, पारू एक गावाकडची मुलगी आहे परकर पोलकं घालते. ज्या दिवशी ऑडिशनसाठी कॉल आला त्यावेळी मी कामानिमित्त बाहेर होते. मी आईला कळवले की परकर पोलकं घालून एक ऑडिशन शूट करायचं आहे. तेव्हा माझी आई ताबडतोप परकर पोलकं आणायला बोरिवली हुन लालबागला गेली. तिथे तिला सापडले नाही मग ती तिथून दादर मार्केटला गेली तिथे फायनली एका दुकानात तिला परकर पोलकं मिळालं, माझ्या आईनेच मोबाईलवर ऑडिशन शूट केलं.
पारू ह्या पात्रासाठी माझी निवड झाली याच श्रेय मी आईला देईन. तिच्या मेहनत आणि आशिर्वादाने ते ऑडिशन इतक्या छानपणे पार पडले. माझा परिवार, नातेवाईक आणि मित्र मंडळी खूप खुश झाले जेव्हा त्यांनी पारूच्या प्रोमो पाहिला आणि त्याहुन जास्त आनंद त्यांना ह्या गोष्टीचा झाला की मी झी मराठीची मालिका करतेय कारण झी मराठीच्या मालिका लोकांच्या मनात वेगळाच घर करून जातात. सगळे अतिशय खुश आहेत आणि सोशल मीडियावर ही मला छान प्रतिसाद मिळत आहे. मालिकेमध्ये पारू सोबत एक गोडशी बकरी आहे जी तिची मैत्रीण आहे. पारूने तीच नाव वैजू ठेवलंय. पारूला आई नाही त्यामुळे तिच्या सुख दुःखात क्षणात वैजूच तिची जवळची मेत्रीण आहे. मला मुळात प्राणी खूप आवडतात त्यांना कसं सांभाळायचं हे मला चांगलं जमतं. मीच वैजूला खाऊ घालते आणि तिच्याशी खेळते. कधी - कधी जेव्हा आमच्या शूटच दुसरीकडे शिफ्टिंग होत असत तेव्हा तिचं म्हणणं असत की तिला ही सोबत घेऊन जायचं आणि हे ती तिच्या खुणांच्या भाषेनी सांगते. माझं वैजूशी फक्त ऑनस्क्रीन नाही तर ऑफस्क्रीन ही वेगळंच ट्युनिंग आहे. माझ्या बद्दल बोलायचं झालं तर मी शास्त्रीय नर्तक आहे. भरतनाट्यम् मध्ये १५ वर्ष प्रशिक्षण घेतले आहे. मी हेमा मालिनीजी सोबत योशोदा कृष्णा मध्ये ही स्टेजवर परफॉर्म केले आहे. मला फिरायला आणि पेन्टिंग करायला खूप आवडतं.
झी मराठी वर पाहायला विसरू नका 'पारू' सोमवार ते शनिवार संध्या. ७. ३० वा.