Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

डॉनिअर ग्रुपच्या ‘निओ स्ट्रेच# फ्रीडम टू मूव्ह’ चे लाँचिंग: टायगर श्रॉफसह एक ग्रॅंड म्युझिकल प्रवास*

*डॉनिअर ग्रुपच्या ‘निओ स्ट्रेच# फ्रीडम टू मूव्ह’ चे लाँचिंग: टायगर श्रॉफसह एक ग्रॅंड म्युझिकल प्रवास* *राष्ट्रीय:* भारतातील फॅशन आणि लाईफस्टाईलमध्ये अग्रेसर असलेला डॉनिअर ग्रुप त्याच्या अनोख्या संकल्पनांसाठी ओळखला जातो. आताही त्यांची ‘फ्रीडम टू मूव्ह’ या संकल्पनेनं फॅशन जगतात धूम उडवून दिली आहे. या सांगीतिक उपक्रमाच्या माध्यमातून टायगर श्रॉफ, नताशा भारद्वाज आणि जन्नत झुबीर रेहमानी या तीन स्टार्सने ‘निओ स्ट्रेच फॅब्रिक’ लाँच केले आहे. या जबरदस्त स्टारकास्टच्या माध्यमातून डॉनिअर ग्रुपने चारही बाजूंनी स्ट्रेच होणारे जगातील सर्वोत्तम कापड आणले आहे. ज्यामुळे तुम्हाला प्रकारची हालचाल अगदी सहजपणे करता येऊ शकते. प्रसिध्द संगीत व्हीडीओ दिग्दर्शक मिहीर गुलाटी यांनी डॉनिअर ग्रुपसाठी या व्हीडीओचे दिग्दर्शन केले आहे तर ड्रीम्सवॉल्टमिडीया आणि बँग ऑन फिल्म्सने या म्युझिकल व्हीडीओची निर्मिती केली आहे. फॅशन आणि संगीताचा सुंदर मिलाफ या लाँचिंगमध्ये दिसून येतो. त्यामुळे फॅशन आणि संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी या लाँचिंगला हजेरी लावली. कापड उद्योगातील एक चमत्कार समजला जाणाऱ्या आणि चारही बाजूंनी स्ट्रेच होँणाऱ्या कापडाचे सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या डॉनिअर ग्रुपच्या वतीने कापडातील या नावीन्याबरोबरच हालचालीतील स्वातंत्र्याबरोबरचा एक अनोखा संगम सर्वांसमोर आणला आहे. त्याचबरोबर पाणी शोषून घेण्याची कापडाची अतुलनीय क्षमता, लवचिकता आणि आरामही प्रदान करण्यासह बाजारपेठेत एक नवीन मानकही तयार केले आहे.
विविध आवडींची पूर्तता करण्यासाठी निओ स्ट्रेच सुटींगचे कापड हे पॉलिस्टर व्हिस्कोस, कॉटन, लिनेन, आणि लोकर अशा विविध प्रकारांत उपलब्ध असतील. निओ स्ट्रेचसाठी एक विशिष्ट जागा तयार करणे आणि लिवा तसेच लायक्रा यांच्यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण कापडांच्या विभागांमध्ये त्यांचा समावेश करणे हे या मोहिमेचा उद्दिष्ट आहे. याप्रसंगी अभिनेता टायगर श्रॉफने त्याच्या या भावना या शब्दांत व्यक्त केल्या, “ ’फ्रीडम टू मूव्ह’ या प्रकल्पाचा भाग होताना मला खूप आनंद होत आहे. या नवीन कापडामुळे किती आराम मिळतो हे या सांगितीक फ्युजनमधून सांगण्यात आले आहे. ज्यामुळे मला संगीत आणि हालचालींच्या माध्यमातून स्वत:ला व्यक्त करण्याचे स्वातंत्र्यही मिळते.वैयक्तिकरित्या सांगायचे तर माझ्या कार्यक्रमाआधीच्या सरावासाठी आणि जिम्नँस्टिक साठी सगळ्यात जास्त तयारी करुन घेणारं कुणीतरी आहे, आणि निओ स्ट्रेच म्हणूनच गेम चेंजर आहे आरामाबद्दलच्या सगळ्या शंका ते दूर करते आणि माझ्या लवचिकतेनुसार मला स्ट्रेचही करता येते. मी खरोखरंच उत्साहीत आहे. आणि या ट्रॅकमध्ये आम्हाला आलेल्या अफाट उर्जेचा प्रत्येकाला अनुभव यावा यासाठी मी प्रचंड आतूर आहे.” डॉनिअर इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेंद्र व्ही. अग्रवाल यांनीही या लाँचच्या वेळेस आपल्या भावना व्यक्त केल्या, “ निओ स्ट्रेचसाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून टायगर श्रॉफची निवड करणे हे अगदी साहजिक होते. त्याची अफाट उर्जा आणि नैसर्गिक स्टाईल आमचे नावीन्यपूर्ण फॅब्रिक निओ स्ट्रेचच्या वैशिष्ट्यांशी साधर्म्य साधणारी आहे. डॉनिअर ग्रुपचे हे फॅब्रिक म्हणजे गुणवत्ता आणि आराम व फॅशनची नव्याने व्याख्या करण्याच्या प्रयत्नाशी आमची बांधीलकी आहे. डॉनिअरमध्ये आम्ही विश्वास ठेवतो की, निओ स्ट्रेचसह आम्ही कापड जगतात नवीन बेंचमार्क प्रस्थापित करु.” ‘फ्रीडम टू मूव्ह’ या मोहिमेबद्दल बोलताना, डॉनिअर ग्रुप, ब्रँड मार्केटिंगचे एव्हीपी आकाश मिश्रा म्हणाले की, “या वेगळ्या आणि खास फॅब्रिकसाठी विशेष स्थान निर्माण करणे आणि त्याचा अनुभव सर्वांपर्यंत पोहोचवणे ही ‘फ्रीडम टू मूव्ह’ या मोहिमेमागील कल्पना होती आणि निओ स्ट्रेच हे आमचे उत्पादन या फॅशन जगतातील क्रांतीचे सगळ्यांत महत्त्वाचे उत्पादन आहे. निओ स्ट्रेचला फॅशन जगतातील प्रतिष्ठित व लोकप्रिय नाव बनविणे हेच आमचे लक्ष्य आहे. या म्युझिकलचा प्रत्येक टप्पा आणि प्रत्येक हालचाल ही या फॅब्रिकमुळे मिळणाऱ्या आराम, फिटिंग आणि स्वातंत्र्याचे प्रतिनिधीत्व करते. नावीन्य व सर्जनशीलतेच्या या रोमांचक प्रवासासाठी आमच्याबरोबर राहा.”
दिग्दर्शक मिहीर गुलाटी यांनीही या रिलीजच्या वेळेस आपल्या भावना व्यक्त केल्या. “टायगर श्रॉफ, जन्नत आणि नताशा अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘फ्रीडम टू मूव्ह’ चे दिग्दर्शन करणे हा एक मस्त अनुभव होता. मनोरंजन क्षेत्रांतील अनेक सीमा पार करणे आणि निओ स्ट्रेचशी जोडल्या जाणाऱ्या मनोरंजनाच्या संकल्पनेला पुन्हा नव्याने परिभाषित करणे ही या व्हीडीओमागील संकल्पना आहे. या गाण्यात संगीत, नृत्य आणि फॅशनचा सुरेख संगम साधण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत आम्ही तयार केलेले हे उत्साही, चैत्यन्यदायी फ्युजन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास मी आतूर आहे. ” या मोहिमेच्या लाँचच्या वेळेस बॉलीवूडचे स्टायलिस्ट कझीम दिल्लीवाला यांनीही आपल्या बावना व्यक्त केल्या. “टायगर, जन्नत आणि नताशा यांच्यासाठी ‘निओ स्ट्रेच फ्रिडम टू मूव्ह’ कलेक्शनमधून वॉर्डरोब तयार करणे हा अत्यंत सर्जनशील अनुभव होता. संगीताची लय आणि उर्जेसह कलाकारांना परफॉर्म करताना प्रत्येक पोशाख त्यांना त्यांच्या सादरीकरणासाठी स्वातंत्र्य देत होता आणि त्याचबरोबर त्यांना आकर्षकही बनवत होता. हे एक गंमतीशीर आन्हान होते आणि, आरामाबरोबर कोणतीही तडजोड न करता निओ स्ट्रेचने हा संपूर्ण अनुभव दृश्यात्मकदृष्ट्याही उत्तम बनवला.” त्यामुळे आता चारही बाजूंनी स्ट्रेच होणाऱ्या जगातील सर्वोत्तम फॅब्रिक निओ स्ट्रेचसह अशा जगाची सफर करा, जिथे तुमची प्रत्येक हालचाल ही नृत्य असेल आणि प्रत्येक नृत्य ही स्वातंत्र्याची अभिव्यक्ती असेल. कापडाच्या दुनियेतील नावीन्याच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या डॉनिअर ग्रुपने असे फॅब्रिक आणले आहे जे फक्त परिधान केले जात नाही, तर अनुभवले जाते, असा अनुभव जो मनोरंजनाच्या लयीशी अगदी जोडलेला असेल. *टायगर श्रॉफ, नताशा भारद्वाज आणि जन्नत झुबीर यांच्या सादरीकरणाने सजलेले “फ्रीडम टू मूव्ह” येथे पाहा* - https://www.youtube.com/watch?v=Y2pP03kQgeE

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.