Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जिओसिनेमावर लाइव्‍ह स्‍ट्रीमिंग होणाऱ्या सेलिब्रिटी क्रिकेट लीग २०२४ साठी सेलेब्रिटी सज्‍ज

भारतीय चित्रपटसृष्‍टीमधील सुपरस्‍टार्स आले एकत्र! सोहेल खान, मोहनलाल, रितेश देशमुख, सचिन जोशी, राजकुमार जिओसिनेमावर लाइव्‍ह स्‍ट्रीमिंग होणाऱ्या सेलिब्रिटी क्रिकेट लीग २०२४ साठी सेलेब्रिटी सज्‍ज जिओसिनेमा या भारतातील आघाडीच्‍या स्‍ट्रीमिंग गंतव्‍याने सेलिब्रिटी क्रिकेट लीग (सीसीएल) सोबत सहयोगाची घोषणा केली आहे. या सहयोगांतर्गत व्‍यासपीठ सेलिब्रिटी क्रिकेट लीग सीझन १० चे एक्‍सक्‍लुसिव्‍ह लाइव्‍ह स्‍ट्रीमिंग करणार आहे. अल्टिमेट स्‍पोर्टन्‍मेंट मानले जाणाऱ्या सीसीएलमध्‍ये क्रीडा व मनोरंजनाचे अनोखे एकत्रीकरण आहे आणि भारतातील ही एकमेव अद्वितीय आयपीएल आहे. चार वीकेण्‍ड्सपर्यंत चालणारी आणि क्रिकेटप्रेमी व्‍यतिरिक्‍त प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या २० मनोरंजनपूर्ण सामन्‍यांसह या रोमहर्षक टूर्नामेंटचे लाइव्‍ह स्‍ट्रीमिंग २३ फेब्रुवारी २०२४ पासून फक्‍त जिओसिनेमावर होणार आहे.
२०११ मध्‍ये सुरू झालेली सेलिब्रिटी क्रिकेट लीग भारतातील सर्वाधिक पाहिली जाणारी क्रीडा व मनोरंजन इव्‍हेण्‍ट बनली आहे. व्‍यापक टेलिव्हिजन व डिजिटल पोहोचसह सेलिब्रिटी क्रिकेट लीगचा मागील सीझन देशभरातील २५० दशलक्षहून अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. हिंदी, पंजाबी, भोजपुरी, बंगाली, तमिळ, तेलुगु, कन्‍नड व मल्‍याळम या भाषांमधील भारतातील प्रमुख चित्रपटसृष्‍टीचे प्रतिनिधीत्‍व करणाऱ्या ८ टीम्‍सचा समावेश असलेले सीसीएल सीझन १० २०० हून अधिक सर्वाधिक फॉलो केले जाणारे व लोकप्रिय चित्रपट सेलिब्रिटीज एकाच व्‍यासपीठांतर्गत एकत्र येतील आणि अद्वितीय मनोरंजनाचा आनंद देतील. सीसीएलशी संबंधित दिग्‍गज आहेत मुंबई हिरोजचे ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर सलमान खान, मुंबई हिरोजचे कर्णधार रितेश देशमुख, मुंबई हिरोजचे मालक सोहेल खान, तेलुगु वॉरिसर्यचे ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर वेंकटेश, तेलुगु वॉरिसर्यचे कर्णधार अखिल अक्किनेनी, चेन्‍नई रायनोजचे कर्णधार, आर्य, कर्नाटक बुलडोजर्सचे कर्णधार सुदीप, केरला स्‍ट्रायर्सचे सह-मालक मोहनलाल, केरला स्‍ट्रायकर्सचे कर्णधार इंद्रजीत, भोजपुरी दबंग्‍जचे कर्णधार मनोज तिवारी, पंजाब दे शेरचे कर्णधार सोनू सूद आणि बंगाल टायगर्सचे मालक बोनी कपूर यांच्‍यासह त्‍यांच्‍या टीमचे कर्णधार जिस्‍सू सेनगुप्‍ता. सेलिब्रिटी क्रिकेट लीगसोबतच्‍या सहयोगाबाबत किच्‍चा सुदीप म्‍हणाले, ''रोमहर्षक सामना असो किंवा कॅज्युअल सामना असो मी नेहमी माझ्या टीमला पाठिंबा देतो. खेळाडू व कर्णधार म्‍हणून मैदानात उतरताना सामना खेळण्‍यासह उत्‍साह वाढवण्‍याला, तसेच मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्‍याला प्राधान्‍य देणे महत्त्वाचे आहे. सीसीएल क्रिकेट स्‍पर्धा असण्‍यासह आत्‍मपरीक्षणाचा प्रवास देखील आहे. या लीगमध्‍ये आम्‍ही विजय मिळवण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यासोबत आम्‍हा सर्वांना आवडणाऱ्या खेळाचा एकत्र आनंद देखील घेतो.'' सेलिब्रिटी क्रिकेट लीगसोबतच्‍या सहयोगाबाबत सोनू सूद म्‍हणाले, ''माझ्यासाठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग खेळापेक्षा अधिक आहे. ही लीग आम्‍हा कलाकारांकरिता एकत्र येऊन मैदानावर व मैदानाबाहेर खूप धमाल करण्‍याची संधी देते. मला एक विनोदी घटना आठवते. मैदानावर फलंदाजी करत असताना मी हवेत चेंडू मारला आणि मनोज झेल पकडण्‍यासाठी चेंडूखाली होता. मी जोरात ओरडलो 'प्‍लीज झेल सोड'. पण त्‍याने झेल पकडला आणि त्‍यानंतर धमाल करत माझ्याजवळ आला व म्‍हणाला, 'माफ कर पाजी, माफ कर मित्रा, चुकी झाली'. आता मी हा नवीन सीझन आमच्‍यासाठी काय घेऊन आला आहे हे पाहण्‍यासाठी खूप उत्‍सुक आहे.''

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.