अक्षरा समोर आलं भुवनेश्वरीच सत्य !
February 06, 2024
0
*अक्षरा समोर आलं भुवनेश्वरीच सत्य !*
झी मराठीची चर्चित मालिका *'तुला शिकवीन चांगलाच धडा'* या मालिकेत रोज नवीन ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळतायत. अक्षरा आणि भुवनेश्वरी मधलं नातं एक वेगळं वळण घेताना दिसणार आहे. अक्षराने पुनः शाळेत जायला सुरवात केली आहे हे भुवनेश्वरीला बिलकूल आवडलेलं नाही. अक्षराच्या शाळेच्या पहिल्या दिवशीच भुवनेश्वरी फुलपगारे सरांना फोन करुन सांगते की अक्षराला जर शाळेत घेतलंत तर तुमचा तो शाळेत शेवटचा दिवस असेल. अक्षरा भुवनेश्वरीचा हा डाव तिच्यावरच उलटवणार का? फुलपगारेसरांची नोकरी वाचणार का? भुवनेश्वरीला सतत होणारी तिची हार आता सहन होत नाहीये. तेव्हा ती अक्षराच्या बहिणीला म्हणजेच इराला आपल्या सोबत घेतेय. ह्याच बरोबर भुवनेश्वरी, चारुहासने जो भूतकाळ उलगडला त्यामध्ये तिची काय बाजू आहे हे स्वत:हून अक्षरासमोर व्यक्त करते.
आता भुवनेश्वरीच हे सत्य खरं आहे की कोणतं नवीन नाटक? हे येणाऱ्या भागातच कळेल. तेव्हा पाहायला विसरू नका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ सोमवार ते शनिवार रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.