‘लग्नकल्लोळ’चे धमाकेदार टिझर प्रदर्शित
February 03, 2024
0
*‘लग्नकल्लोळ’चे धमाकेदार टिझर प्रदर्शित*
मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘लग्नकल्लोळ’ या चित्रपटाचा जबरदस्त टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टिझर पाहून प्रेक्षक या धमाकेदार चित्रपटाची आतुरतेने वाट पाहाणार, हे नक्की! टिझरमध्ये सिद्धार्थ सोबत मयुरी लग्नमंडपात दिसत आहे तर दुसऱ्या क्षणी भूषण मयुरीला लग्नाची मागणी घालताना दिसत आहे. यावरून मयुरी नक्की कोणासोबत लग्न करणार आणि हा काय ‘लग्नकल्लोळ’ सुरू आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे. चित्रपटात या प्रमुख कलाकारांसोबत अनेक दमदार कलाकार आहेत. हा लग्नाचा धमाका १ मार्चला उडणार आहे.
मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे, आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित 'लग्न कल्लोळ' या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक, मोहम्मद बर्मावाला म्हणतात, " चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. लग्न म्हटले की घरात कल्लोळ हा आलाच. परंतु हा कल्लोळ जरा वेगळा आहे. यात ट्विस्ट आहे. हा कौटुंबिक चित्रपट असून प्रेक्षकांसाठी निखळ मनोरंजनाचा खजिना आहे.’’