स्टार प्रवाह परिवारात दाखल होतेय नवी मालिका ‘साधी माणसं’
February 12, 2024
0
स्टार प्रवाह परिवारात दाखल होतेय नवी मालिका ‘साधी माणसं’
सहकुटुंब सहपरिवार मालिकेतला पश्या म्हणजेच लोकप्रिय अभिनेता आकाश नलावडे आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री शिवानी बावकर दिसणार नव्या रुपात
१७५ आठवडे सातत्याने आघाडीवर रहात स्टार प्रवाह वाहिनीने संपूर्ण महाराष्ट्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. स्टार प्रवाहच्या सर्वच मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. प्रेक्षकांच्या अभिरुचीचा अभ्यास करुन त्यांना आपलेसे वाटतील असे मालिकेचे विषय, घरातील सदस्य वाटावीत अशी पात्र आणि सोबतीला जाणकार अशी लेखक, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांची फौज हेच स्टार प्रवाहचं खऱ्या अर्थाने वेगळेपण. मायबाप प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच आज संपूर्ण महाराष्ट्राची पहिली पसंती आहे स्टार प्रवाह वाहिनीला. हेच प्रेम द्विगुणीत करण्याच्या हेतूने स्टार प्रवाह सादर करीत आहे नवी मालिका साधी माणसं. जगात चांगली आपली सांगली असं आत्मविश्वासाने मिरवणाऱ्या सांगली शहरात या मालिकेची गोष्ट घडते. मीरा आणि सत्या या गोष्टीतली दोन मुख्य पात्र. एकाच गावात रहात असले तरी स्वभाव मात्र टोकाचे. मीरा स्वभावाने अतिशय सकारात्मक, सहनशील आणि संपूर्ण कुटुंबाचा विचार करणारी. घरची परिस्थिती बेताची असली तरी हेही दिवस सरतील असा आत्मविश्वास बाळगणारी. तर सत्या आणि नशिबाचा ३६ चा आकडा आहे. डॉक्टर व्हायचं त्याचं स्वप्न होतं पण गॅरेजमध्ये मेकॅनिकचं काम करतो. स्वत:च्या धुंदीत रहाणारा. अश्या या विभिन्न स्वभावाच्या मीरा आणि सत्यामध्ये नियती नेमका कोणता खेळ करणार याची गोष्ट म्हणजे साधी माणसं ही मालिका.
स्टार प्रवाहचे बिझनेस हेड यांच्या संकल्पनेतून स्टार प्रवाहच्या मालिकांचे शीर्षक आकाराला येतात. साधी माणसं ही मालिका देखिल त्यापैकीच एक. मालिकेचं नाव नेमकं त्यांना कसं भावलं हे सांगताना सतीश राजवाडे म्हणाले, ‘साध्या गोष्टी साधी माणसं नेहमी मनाला भिडतात. साधी माणसं मालिकेची गोष्ट नावाप्रमाणेच आहे. साधं रहाणीमान पण मोठी स्वप्न पूर्ण करताना समोर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला ते कसे न हरता सामोरं जातात आणि जगतात. अश्या प्रेमळ माणसांची असामान्य गोष्ट साधी माणसं या मालिकेच्या माध्यमातून रसिकांसमोर मांडण्याचा प्रयत्न आहे.’
अभिनेता आकाश नलावडे ही नवी भूमिका साकरण्यासाठी खूपच उत्सुक आहे. पश्या या माझ्या भूमिकेला खूप प्रेम मिळालं. या भूमिकेने मला घराघरात पोहोचवलं. तेच प्रेम सत्यालाही मिळेल ही अपेक्षा आहे. या मालिकेतला माझा लूकही खूप वेगळा आहे. साध्या माणसांची ही गोष्ट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असं आकाश म्हणाला.
सुप्रसिद्ध अभिनेत्री शिवानी बावकर आणि सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतून घराघरात पोहोचलेला पश्या म्हणजेच लोकप्रिय अभिनेता आकाश नलावडे या मालिकेत मीरा आणि सत्याची भूमिका साकारणार आहेत. स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती रणजीत ठाकूर आणि हेमंत रुपारेल यांच्या फ्रेम्स प्रोडक्शनची आहे. अजय कुरणे या मालिकेचं दिग्दर्शन करणार असून अनेक दिग्गज कलाकार मालिकेतून भेटीला येतील. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका साधी माणसं लवकरच फक्त स्टार प्रवाहवर.