प्रमुख गुंतवणूकदार विजय केडिया यांनी मोतीलाल ओसवाल यांचा प्रवास केला संगीतमय*
February 06, 2024
0
*प्रमुख गुंतवणूकदार विजय केडिया यांनी मोतीलाल ओसवाल यांचा प्रवास केला संगीतमय*
*३७ इयर्स अँड कॉऊंटिंग हे गाणं सध्या ट्रेण्डिंग असून अनेकांना प्रेरणा देणार तर लक्ष वेधून घेणार हे गाणं मोतीलाल ओसवाल याना खऱ्या अर्थाने मान देत आहे.*
*प्रेरणादायी गीते सर्वांसाठी मनोरंजन करतात, शिक्षित करतात आणि सर्वांसाठी आठवणींची खिडकी खुली करतात हेव्यापारी आणि गुंतवणूकदारसाठी सुद्धा सारखेच असत*
*मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (MOFSL) यंदा भांडवली बाजारातील ३७ वर्षे साजरी करत आहे.*
हा प्रवास साजरा करण्यासाठी त्यांनी सर्वांसाठी एक मनोरंजक संगीतमय पर्वणी आपल्या भागधारक लोकांसाठी आणली आहे आणि ती पर्वणी म्हणजे एक गं असून हे गाणं सुप्रसिद्ध गुंतवणूकदार विजय केडीया यांनी लिहिलं आणि गायलं आहे.
विजय केडीया यांनी त्यांच्या या सुरेल संगीतमय गाण्यातून मोतीलाल ओसवाल यांची ३७ वर्षाच्या भांडवली बाजरातील प्रवास आणि त्यांची निपुणता मांडली आहे. मोतीलाल ओसवाल यांच्या इतिहासावर भर देणार हे गाणं ग्राहकांच मनोरंजन तर करतच पण त्याच बरोबर त्यांना प्रेरणा सुद्धा देणार आहे.
केडिया यांच्या या संगीतपूर्ण गाण्यातून सर्व व्यापारी आणि गुंतवणूकदारांसाठी आठवणींची ओढ सुद्धा जागृत करत आहे. गुणवत्ता पूर्ण गुंतवणूक तसेच ग्राहकांचा विश्वास जिंकलेलय मोतिलास ओसवालचे या गाण्यातून त्यांच्या ३७ वर्षातील ठळक घडामोडीचा आढावा सुद्धा हे विजय केडिया यांनी या गाण्यातून घेतलं आहे.
या संगीतमय गाण्याबद्दल गुंतवणूकदार विपुल केडिया सांगतात ' हे गाणं मला स्वतःला सुद्धा प्रेरणा देणार आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअलच्या उल्लेखनीय प्रवासाचा साक्षीदार मी राहिलेलो आहे. त्यांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी आणि ग्राहकांना दिलेलं समाधान हे आम्हा सगळ्यांना प्रेरणा देणार आहे. या गाण्याची रचना करण्याच्या कल्पनेची चर्चा चालू असताना मला ओसवाल यांच्या कडून अनेक गोष्टी कळाल्या आणि एक गुंतवणूकदार असल्यामुळे माझ्या फार कामी येणाऱ्या आहेत. हि चर्चा माझ्यासाठी फार रोमांचकारी ठरली त्यातून या गाण्याचा जन्म झाला आहे. हे गाणं ओसवाल यांच्या ३७ वर्षाच्या प्रवासाला एक वेगळी ओळख निर्माण करून देणार ठरेल. मला आशा आहे की कंपनीचा प्रवास आणि सर्व भागधारकांचा सामायिक उत्साह आणि
व्यापार आणि गुंतवणुकीच्या जगासाठी वचनबद्धता म्हणून यग्नायाकडे पाहिलं जाईल.'
तर या संगीतमय प्रवासाचे जनक श्री मोतीलाल ओसवाल, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे सीईओ सांगतात “आमच्या या ३७ वर्षांच्या उल्लेखनीय प्रवासाची ही सांगीतिक कथा सांगताना आनंद झाला. दूरदर्शी दृष्टिकोनासह आर्थिक सेवा देणं हे आमचं ध्येय आहे. श्री विजय केडिया यांचा लेखनाचा अभिनव प्रयत्न आणि आमच्या कंपनीच्या मार्गक्रमणाचा अंतर्भाव करणारी एक संगीतमय कलाकृती गाणे आमच्या भांडवलाचे प्रतीक आहे. संशोधन, सल्लागार आणि ग्राहक-केंद्रिततेच्या वचनबद्धतेसह बाजारपेठेचा प्रवास याचा हा हे संगीतमय आलेख आमच्या यशाचा उत्सव साजरा करतो'.
३७ इयर्स अँड कॉऊंटिंग हे गाणं सध्या ट्रेण्डिंग असून अनेकांना प्रेरणा देणार तर लक्ष वेधून घेणार हे गाणं मोतीलाल ओसवाल याना खऱ्या अर्थाने मान देता आहे.