नेत्रा, इंद्राणी आणि रूपालीला दिसणार त्रिनयना देवीचा दिव्यप्रकाश
February 06, 2024
0
*नेत्रा, इंद्राणी आणि रूपालीला दिसणार त्रिनयना देवीचा दिव्यप्रकाश*
सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत आजीच्या मृत्यूमुळे घरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रूपालीचा खरा चेहरा सर्वांना कळल्यामुळे सर्वजण रूपालीला पाहून घाबरू लागले आहेत. नेत्रा मात्र घरातील सर्वांना धीर देत आहे. एके दिवशी नेत्रा आणि इंद्राणी रूपालीचा सामना करण्यासाठी मनोरमाची शक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा चमत्कार घडतो.
रूपाली मनोरमाच्या अस्थी पाहत असताना एक दिव्यप्रकाश चमकून जातो. हाच प्रत्यय नेत्रा आणि इंद्राणीलाही येतो. या दोघींनाही त्रिनयना देवीचा दिव्यप्रकाश दिसतो. त्यानंतर नेत्रा आणि इंद्राणी दिव्यप्रकाशाबद्दल बोलत असताना नाग ऐकतो. पण रूपाली मात्र आतून घाबरली आहे कारण दिव्यप्रकाश दिसल्यानंतर दुसऱ्या दिवशी हातावर त्रिनयना देवीचं चिन्हसुद्धा तिला दिसतं.
रूपालीला त्रिनयना देवीचं चिन्ह हातावर का आलं आहे, याचा अर्थ लागत नाही.मालिका सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली असून त्रिनयना देवीचा दिव्यप्रकाश दिसल्यावर महत्त्वपूर्ण बदल मालिकेत होणार आहेत. तसेच मनोरमाची शक्ती कुणाला मिळणार नेत्राला की रूपालीला हेही लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे.
यासाठी पाहायला विसरू नका 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' फक्त आपल्या झी मराठीवर.