नीरज पांडे यांची डिस्कव्हरी चॅनल वर प्रसारित होणारी 'सिक्रेट्स ऑफ द बुद्धा रेलिक्स' हि डॉक्युमेंटरी अवश्य पहा
February 18, 2024
0
या ५ कारणासाठी नीरज पांडे यांची डिस्कव्हरी चॅनल वर प्रसारित होणारी 'सिक्रेट्स ऑफ द बुद्धा रेलिक्स' हि डॉक्युमेंटरी अवश्य पहा
गौतम बुद्धांच्या अमर दृष्टीने आणि शिकवणीने अगणित पिढ्यांना दिशा दिली आहे व काळाच्या चाकोरीवर मात करून त्यांची संदेश आजही तितकाच महत्त्वाचा ठरलेला आहे. परंतु, गौतम बुद्धांचे शेवटचे दिवस व बौद्ध धर्मात अतिशय महत्त्वाचे असलेले त्यांचे अवशेष ह्यांच्याबद्दल अनेक प्राचीन दंतकथा आहेत. ह्या अवशेषांभोवती असलेले गूढ उलगडण्यासाठी वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी 'सिक्रेट्स' या लोकप्रिय फ्रँचायजीचा तिसरा भाग ‘सीक्रेटस ऑफ द बुद्धा रेलिक्स,’ प्रसारित करण्यासाठी सज्ज आहे. सीक्रेटस ऑफ द बुद्धा रेलिक्स डिस्कव्हरी चॅनलवर २६ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री ९ वाजता प्रसारित होईल. नीरज पांडे व फ्रायडे स्टोरीटेलर्सची निर्मिती असलेल्या आणि राघव जयरथ दिग्दर्शित या डॉक्युमेंटरीच सूत्रसंचालन राष्ट्रीय व पद्मश्री पुरस्कार विजेता अभिनेता मनोज वाजपेयी करणार आहे. या डॉक्युमेंटरी मध्ये दर्शकांना बुद्धांच्या अवशेषांच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वाबद्दल नवीन माहिती मिळेल. या ५ कारणांसाठी हि डॉक्युमेंटरी प्रेक्षकांनी आवर्जून बघितली पाहिजे:
1. गौतम बुद्धांचे अंतिम दिवस
गौतम बुद्धांनी त्यांचे शेवटचे दिवस कसे घालवले आणि त्यांनी त्यांच्या अवशेषांद्वारे जगभर त्यांच्या शिकवणीचा प्रसार कसा केला याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? 'सिक्रेट्स ऑफ द बुद्धा रेलिक्स' गौतम बुद्धांच्या अवशेषांचा इतिहास आणि त्यांचे मूळ यांच्याशी संबंधित गूढ कथांवर व्यापकपद्धतीने उत्तर देते.
2. बुद्ध अवशेषांचे वर्गीकरण आणि त्यांचे महत्त्व
हि डॉक्युमेंटरी अत्यंत सोप्या आणि सहज पद्धतीने बुद्ध अवशेषांचे वर्गीकरण आणि त्यांचे महत्त्व याचे स्पष्ट चित्र सादर करते. हे पिप्रहवा आणि वैशाली सारखे स्तूप जेथे बुद्ध अवशेष स्थापित आणि पूजनीय आहेत त्यांच्याबद्दल माहिती या डॉक्युमेंटरीमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यात हे देखील स्पष्ट केलं आहे कि, बुद्धाच्या निधनानंतर त्यांचं अवशेषांच्या वितरणामुळे त्या काळातील विविध राज्यांमधील राजांमध्ये कसा तणाव निर्माण झाला.
3. तज्ञांकडून मिळालेली माहिती
‘सिक्रेट्स ऑफ द बुद्धा रेलिक्स’ या डॉक्युमेंटरीमध्ये अनेक विद्वान, बौद्ध धर्माचे अभ्यासक, इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञ यांनी गौतम बुद्ध आणि त्यांच्या अवशेषांबद्दल बद्दल माहिती सांगितली आहे. चित्रपट निर्माते डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी, डॉ. बी.आर. मणी, आणि डॉ. तिष्यरक्षिता भार्गव, यांसारख्या प्रसिद्ध प्रवक्त्यांच्या अंतर्दृष्टीसह, बुद्धांचे शेवटचे दिवस, त्यांच्या अवशेषांचे वितरण, बुद्धांचा शेवटचा प्रवास आणि अवशेषांची स्थाने, याबद्दलची माहिती या प्रेक्षकांना या डॉक्युमेंटरीमध्ये मिळेल.
4. गौतम बुद्धांचे शेवटचे भोजन
बुद्धाचे शेवटचे जेवण हा अगणित अनुमानांचा विषय आहे आणि तो गूढतेने व्यापलेला आहे. विविध सिद्धांत बुद्धाच्या अंतिम भोजनाचे स्पष्ट चित्र रेखाटतात. ‘सिक्रेट्स ऑफ द बुद्धा रेलिक्स’ या घटनेचे महत्त्व विविध ऐतिहासिक पुराव्यांद्वारे तपासते. या चित्तथरारक कथनांमधून, एक प्रचलित विश्वास उदयास येतो, ज्यामध्ये बुद्ध सुकारा-मद्दव नावाच्या स्वादिष्ट पदार्थाचा आस्वाद घेत असल्याचे चित्रित करते.
5. बुद्ध अवशेषांची प्रासंगिकता
हि डॉक्युमेंटरी आधुनिक जगात बुद्ध अवशेषांचे महत्त्व आणि ते अवशेष प्रबोधन आणि शांततेचे शक्तिशाली प्रतीक म्हणून कसे कार्य करतात यावर देखील जोर देते. त्यांनी बुद्धांच्या अनुयायांचे संरक्षण आणि एकीकरण कसे केले आणि भूतकाळात परकीय आक्रमणे होऊनही त्यांनी कसे सहन केले हे देखील ते अधोरेखित करते.
~ डिस्कव्हरी चॅनलवर सोमवार २६ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री ९ वाजता ‘सिक्रेट्स ऑफ द बुद्धा रेलिक्स’चा प्रीमियर चुकवू नका, हि डॉक्युमेंटरी डिस्कवरी+ वर देखील उपलब्ध आहे~