*म्यूझिक मंत्रच्या मंचावर ख्यातनाम सिने दिग्दर्शक श्री राजदत्त यांचा ९२वा वाढदिवस सोहळा संपन्न*
February 01, 2024
0
भाव माझ्या मनातला !
*म्यूझिक मंत्रच्या मंचावर ख्यातनाम सिने दिग्दर्शक श्री राजदत्त यांचा ९२वा वाढदिवस सोहळा संपन्न*
*डॉ. स्मिता डोंगरे यांच्या सुश्राव्य सूत्रसंचालनात ज्येष्ठ दिग्गज राजदत्त यांचा जीवनप्रवास उलगडला*
मराठी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम दिग्दर्शक राजदत्त यांच्या ९२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून म्यूझिक मंत्रने गप्पा गोष्टी आणि राजदत्त यांच्या चित्रपटातील गाणी सादर करून व त्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवासाचा आढावा घेत, एका आगळया वेगळया पद्धतीने त्यांचा जन्मदिवस राजदत्त यांच्या नातेवाईक व मित्र परिवारा सोबत साजरा केला.
या कार्यक्रमात म्यूझिक मंत्रच्या संचालिका डॉ. स्मिता डोंगरे यांनी राजदत्त यांची मुलाखत घेताना राजदत्त यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग प्रेक्षकांना सांगीतले. एवढ्या थोर व्यक्तिची साथ आणि आशिर्वाद म्यूझिक मंत्र या आमच्या संस्थेला लाभला, आम्ही धन्य झालो, अशी प्रतिक्रिया म्यूझिक मंत्रचे संचालक डॉ. स्मिता डोंगरे आणि रमेश पूजारी यांनी व्यक्त केली. पारंपरिक पद्धतीने औक्षण करून वाढदिवस साजरा करण्यात आला, या प्रसंगी राजदत्त यांची कन्या प्रसिद्ध चित्रपट संकलक भक्ति मायाळू यांनी म्यूझिक मंत्राच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. म्यूझिक मंत्राच्या संचाने मला खूप भावनिक केले. तुमच्या प्रेमाने मी विरघळून गेलो हा कार्यक्रम मी कधीही विसरू शकणार नाही अशी प्रतिक्रिया जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी व्यक्त केली.
या निमित्त सादर झालेल्या संगीत संध्येमधे म्यूझिक मंत्राच्या गायक गायिकानी बहारदार गाणी सादर केली. त्यात सुनिल खोबरेकर, विजयानंद तांबे, श्रुतिका तांबे, विश्वास सावंत,ललिता शेट्टी, संजय मांगवे, प्रमिला धनु, प्रगति वैद्य, अनिता कांबळे, नूतन सैल, कैलाश माहुर, लीना भगत, शिल्पा शेलार , अर्चना सावंत, रमेश पूजारी आणि डॉ. स्मिता डोंगरे यांनीही गीतांचे सादरीकरण केले. शोभा पूजारी, दशरथ नाईक, नरेन, वत्सला, यांचे सहकार्य लाभले. क्षितिज पटाडे,मिहिर गायकवाड,
सुनिल खोबरेकर,विजू तांबे,दिलीप कोळी यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. या सोहळ्यास मुक्ता इव्हेंट अँड हॉस्पिटॅलिटीचे संचालक संतोष परब व दिपमाला लादे यांचे सहकार्य लाभले.