Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

रितेश देशमुखच्या स्टाईलने लावले वेड .... *महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन* पुरस्कारावर कोरले नाव !

रितेश देशमुखच्या स्टाईलने लावले वेड .... *महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन* पुरस्कारावर कोरले नाव ! अभिनेता रितेश देशमुख हे मराठमोळं नाव बॉलीवूडमध्ये तर गाजत आहेच पण या नावाने गेल्या वर्षभरात मराठी सिनेसृष्टीत वलय निर्माण केले आहे. मराठी सिनेसृष्टीतल्या आपल्या पदार्पणातच रितेशच्या ‘लय भारी’ सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकली होती आणि गेल्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आवडता अभिनेता, उत्तम दिग्दर्शक, यासह आता रितेश देशमुख *'महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन'* सुद्धा ठरला आहे . झी टॉकीज या वाहिनीच्या *‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?* २०२३ या पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर *‘महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन’* पुरस्कार रितेश देशमुख यांनी पटकावला आहे. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षीही स्टाईल आयकॉन बनवण्याचा मान रितेशला मिळाला आहे. झी टॉकीज वाहिनीच्या *'महाराष्ट्राचा फेवरेट कोण? '* या पुरस्कार सोहळ्याकडे अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. *रविवार दिनांक १८ फेब्रुवारी संध्याकाळी ७ वाजता झी टॉकीज वाहिनीवर* हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे चित्रपटाशी निगडित पडद्यावरचे आणि पडद्यामागचे कलाकार यांना प्रेक्षकांच्या पसंतीतून *'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?'* ठरवले जात असल्याने या पुरस्काराची विशेष चर्चा रंगली आहे.
यंदा या पुरस्काराच्या स्पर्धेत अभिनेता अंकुश चौधरी ,स्वप्निल जोशी, सिद्धार्थ जाधव, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ आणि ललित प्रभाकर यांची नावे होती. पण *'महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन'* म्हणून प्रेक्षकांनी रितेश देशमुख याला भरघोस मते देत पसंतीचा कौल दिला. सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ती *'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?'* या पुरस्कार सोहळ्याची .या पुरस्कारांमध्ये विशेष लक्ष वेधून घेणारा पुरस्कार म्हणजे *'महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन.'* गेल्या वर्षी रितेश देशमुख यांच्या वेड या सिनेमांने सर्व वयोगटातील प्रेक्षकांना अक्षरशः वेडं केलं होतं . या सिनेमातील संवाद आणि गाणी तर प्रत्येकाच्या ओठावर रुळलेली होती . रितेशने त्याच्या अभिनयाने आणि दिग्दर्शन कौशल्याने प्रेक्षकांना आपलंसं केलंच आहे तर आता त्याच्या स्टाईलनेही अनेकांना भुरळ घातली आहे . त्यामुळेच यावर्षी झी टॉकीज वाहिनी तर्फे देण्यात येणारा *'महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन'* हा पुरस्कार रितेश देशमुख याच्या नावावर जमा झाला आहे . रितेश नेहमीच त्याच्या हटके स्टाईलने चाहत्यांचे आणि प्रेक्षकांची मन जिंकत असतो . मनोरंजन विश्वात स्वतःचा स्टाईल फंडा निर्माण करण्यात रितेश देशमुख याने बाजी मारली आहे . *'महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन'* हा पुरस्कार प्रेक्षकांच्या पसंतीतूनच मिळाला असल्याने रितेश देशमुखने प्रेक्षकांच्या मनात स्टाईल आयकॉन म्हणून स्थान निर्माण केले आहे. रितेश देशमुख याने बॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहेच . त्याबरोबरच मराठी सिनेमा क्षेत्रात अभिनय, निर्माता आणि दिग्दर्शन अशा तिहेरी भूमिकेत रितेशने त्याची यशस्वी कारकीर्द करून दाखवली . रितेश त्याच्या अंदाजाने नेहमीच प्रेक्षकांना भुरळ पाडतो . सोशल मीडियावरही रितेश चे व्हिडिओ चर्चेत असतात. आता झी टॉकीज वाहिनी तर्फे मिळालेल्या *‘महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन’* या बिरुदाने रितेश ची स्टाईलही प्रेक्षकांना मनापासून आवडल्याचे प्रतिबिंब पुरस्काराच्या रूपाने रितेश च्या हातात आले आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.