झी रिश्ते अवॉर्ड 2024 साठी रेड कार्पेटवर झळकले झी टीव्ही कुटुंब
February 22, 2024
0
झी रिश्ते अॅवॉर्ड्स 2024 साठी रेड कार्पेटवर झळकले झी टीव्ही कुटुंब
~ शब्बीर आहलुवालिया, सृती झा, अर्जित तनेजा, श्रद्धा आर्या, अर्जुन बिजलानी, धीरज धूपार यांचे रेड कार्पेटवरील ग्लॅमरस अवतार पाहणे तुम्ही चुकवूच शकत नाही. ~
मुंबई, 21 फेब्रुवारी 2024: धमाकेदार नॉमिनेशन पार्टीमध्ये तुमच्या सर्व फेव्हरेट झी टीव्ही कलाकारांनी धम्माल केली. आता झी कुटुंब झी रिश्ते अॅवॉर्ड्ससह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. रिश्ते म्हणजेच नाती साजरी करण्यासाठीचे वाहिनीचे वार्षिक झी रिश्ते अॅवॉर्ड्स हे आपले कलाकार, निर्माते आणि झी टीव्हीचे ज्यांच्यासोबत सर्वांत खास नाते आहे अशा प्रेक्षकांसोबत हे सेलिब्रेशन करतात.
ह्यावर्षी हा कार्यक्रम होळीच्या सणाच्या जवळपासच पार पडणार असल्यामुळे तो आणखी खास बनला आहे.
परिवारांनी एकत्र यावे आणि रंगांच्या सणाचा आनंद घ्यावा यासाठी ही अगदी सुयोग्य वेळ आहे. आपल्या आवडत्या व्यक्तिरेखांसोबत असलेले आपले दॄढ नाते साजरे करण्यासाठी झी कुटुंब सज्ज असून मौजेने भरलेल्या ह्या संध्येमध्ये धमाकेदार परफॉर्मन्सेस, मस्ती मजा आणि मजेदार प्रँक्स पाहायला मिळतील, अर्थातच कौटुंबिक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये - बुरा ना मानो, फॅमिली है! डानुबे प्रॉपर्टीज झी रिश्ते अॅवॉर्ड्स 2024 चे प्रसारण 10 मार्च रोजी संध्याकाळी 7 ते 11 च्या दरम्यान फक्त झी टीव्हीवर केले जाईल.
काल रात्री ह्या अॅवॉर्ड्स शो चे चित्रीकरण करण्यात आले जेव्हा सगळेच कलाकार रेड कार्पेटवर आपल्या अनोख्या अंदाजात दिसून आले. ह्या आयकॉनिक झी रिश्ते अॅवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर आपल्या स्टायलिश आणि ग्लॅमरस पोशाखांमध्ये सेलेब्रिटीज झळकले. ‘कैसे मुझे तुम मिल गये’मधील सॄती झा आणि अर्जित तनेजा यांनी आपल्या काळ्या पोशाखात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर ‘क्यूंकि…माँ सास, बहू बेटी होती है’मधील नाविका कोटिया गडद निळ्या साडीमध्ये खूपच आकर्षक दिसत होती.
‘प्यार का पहला नाम राधा मोहन’मधील शब्बीर आहलुवालिया आणि नीहारिका रॉय हे अनुक्रमे त्यांच्या लाल रंगाचा सूट आणि लेहेंग्यामध्ये लक्षवेधी ठरले. तर दुसऱ्या बाजूला ‘रब से है दुआ’मधील हॅन्डसम धीरज धूपार आपल्या लीडींग लेडिज येशा रूघानी आणि सीरत कपूर यांनी हिरव्या रंगाचे पोशाख परिधान केले होते. टेलिव्हिजनवरील सर्वांची लाडकी जोडी ‘भाग्यलक्ष्मी’मधील रोहित सुचांति आणि ऐश्वर्या खरे यांनी सुंदर पांढऱ्या वेशात ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली.
‘कुंडली भाग्य’मधील पारस कलनावटने मस्त जांभळा आणि पांढरा असा रेट्रो लूक घेतला तर सना सय्यदने सुंदर जांभळ्या गाऊनमध्ये रेड कार्पेटवर अक्षरश: आग लावली. ‘इक कुडी पंजाब दी’मधील अविनेश रेखीने काळा सूट आणि सोनेरी फेटा बांधला होता तर त्याची लीडींग लेडी तनिषा मेहताने अतिशय सुरेख लेहेंगा परिधान केला होता. ‘कुमकुम भाग्य’मधील अब्रार काझी आणि राची शर्मा यांनी दोघांनीही रॉयल निळ्या रंगाचे पोशाख निवडले. तर अतिशय आकर्षक अशा फिक्या जांभळ्या रंगाच्या गाऊनमध्ये सर्वांची लाडकी श्रद्धा आर्या ऊर्फ प्रीता सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
कार्पेटवर झळकल्यानंतर झी टीव्हीवरील सिताऱ्यांनी डानुबे प्रॉपर्टीज झी रिश्ते अॅवॉर्ड्सच्या मंचावर काही एक से एक परफॉर्मन्सेस दिले. तुमच्या फेव्हरेट कलाकार आणि शोजपैकी कोणाला नामांकन मिळाले हे जाणून घेण्यासाठी आणि सर्वांचे धमाकेदार परफॉर्मन्सेस पाहण्यासाठी पहा डानुबे प्रॉपर्टीज झी रिश्ते अॅवॉर्ड्स 10 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता फक्त झी टीव्हीवर!