'जाऊ बाई गावात' मकरसंक्रात आहे जोरात हार्दिक ला मिळालं एक गोड सरप्राईझ*
January 11, 2024
0
*'जाऊ बाई गावात' मकरसंक्रात आहे जोरात हार्दिक ला मिळालं एक गोड सरप्राईझ*
'जाऊ बाई गावात' कार्यक्रमात दर आठवड्याला स्पर्धकांना सरप्राईज देण्यासाठी नवीन-नवीन पाहुणे पोहचतात. पण ह्या आठवड्यात स्पर्धकांसोबत हार्दिकला ही मिळणार आहे एक गोड सरप्राईझ. वर्षाचा पहिला सण मकरसंक्रांत, ह्या निमित्ताने मकरसंक्रांतीला गावात येणार आहे पाठक बाई आपल्या सोबत एक नवीन कार्य घेऊन. हो अक्षया देवधर, मकरसंक्रांतच्या खास भागात पारंपारिक वेशात काळी साडी नेसून हार्दिकला भेटायला आली आहे. ही भेट असणार खास. गावात जल्लोषात साजरा होणार वर्षाचा पहिला सण. तिळगुळाचा गोडवा आणि रंगीबेरंगी पतंगाची बहार घेऊन *अक्षया देवधर* आली आहे गावात'. २०२४ ची मकरसंक्रांत होणार आहे हार्दिकसाठी अविस्मरणीय. तेव्हा बघायला विसरू नका 'मकरसंक्रांत' विशेष भाग.
'जाऊ बाई गावात' सोमवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता फक्त झी मराठीवर.