Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

१ मार्चला होणार 'लग्न कल्लोळ'

*१ मार्चला होणार 'लग्न कल्लोळ'* चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित
मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित 'लग्न कल्लोळ' या चित्रपटाचे नवीन मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. या जबरदस्त पोस्टरमध्ये भूषण प्रधान, मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव लग्नाच्या पेहरावात दिसत आहेत. तिघांच्याही हातात हार असून आता ही वरमाला कोणाच्या गळ्यात पडणार, हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तत्पूर्वी या नवीन पोस्टरसोबत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली असून हा 'लग्न कल्लोळ' १ मार्चला होणार आहे. मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे.
'लग्न कल्लोळ' या चित्रपटाच्या नावावरून आणि मोशन पोस्टरवरून हा चित्रपट 'लग्न' या विषयावर भाष्य करणारा चित्रपट आहे, हे दिसतेय. मात्र आता यात 'कल्लोळ' काय पहायाला मिळणार, याचे उत्तर मात्र चित्रपटच देऊ शकेल. दरम्यान या चित्रपटाचे पोस्टर अतिशय कलरफुल आणि प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक, निर्माते डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे म्हणतात, " लग्न... हा विषय तसा म्हटला तर अतिशय जिव्हाळयाचा. हा विषय घेऊन अतिशय सुंदररित्या या चित्रपटाचे लेखन करण्यात आले आहे. पोस्टरवरून प्रेक्षकांना हा अंदाज आला असेलच की, हा चित्रपट प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणार आहे. यात हसू आहे, आसूही आहेत. त्यामुळे आता या 'लग्न कल्लोळा'त सहभागी होण्यासाठी सगळ्यांनी सज्ज राहा.''

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.