Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अप्पी-अर्जुनच्या बाळाचा जीव धोक्यात ?

*अप्पी-अर्जुनच्या बाळाचा जीव धोक्यात ?* अप्पीला पोटात हालचाल जाणवते आणि त्यामुळे, अर्जुन एकदम घाबरुन जातो, तो घरातल्यान आवाज देतो आणि सगळे एकत्र जमा होतात. सर्वांना लवकरच अप्पीची डिलिवरी होणार असे वाटते म्हणून घरी आनंदाचं वातावरण आहे. घरच्यांना अनादी बघून मनीच्या डोक्यात नवीन प्लॅन शिजतोय. घरात चर्चा रंगलेय अप्पीला मुलगी होणार की मुलगा. दुसरीकडे अप्पीची डिलिव्हरी ज्या सरकारी हॉस्पिटल मध्ये होणार आहे त्या हॉस्पिटलचे डॉक्टर त्याच्या सोबतच्या डॉक्टरांना सावध करून काही दिवस हॉस्पिटल मधील त्यांच्या काळ्या व्यवहाराच्या गोष्टी लपवायला सांगतात.
अप्पीची ज्या सरकारी हॉस्पिटलमध्ये डिलिवरीसाठी भरती होते त्या हॉस्पिटल मध्ये एकाच हार्ट मशीनअसल्याने आणि ते अप्पीला दिली गेल्याने एका मुलीच्या आईची परिस्थिती खालावली असल्याचे अप्पीला समजते. हॉस्पिटलमध्ये एकच हार्ट मशीन कशी, ह्याचा गायतोंडे कडून शोध घेते. तेव्हा तिला डॉक्टर आकाश, डॉक्टर साळुंखे आणि व्यवस्थापन विभागाचे अधिकारी ह्यांनी हॉस्पिटलच्या मशीन गायब केल्याचे समजते तेव्हा अप्पी ऐन डिलिवरी आधी ह्या सर्व दोषी लोकांना बडतर्फ करते. अप्पीच्या ह्या वागण्याने तर अप्पीच्या बाळाला धोका तर निर्माण होणार नाही? मनीच्या डोक्यात कोणता नवीन प्लॅन शिजतोय ? अप्पी-अर्जुनच्या बाळावर कोणते संकट येणार आहे.? या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी पाहायला विसरू नका 'अप्पी आमची कलेक्टर' सोमवार ते शनिवार संध्या ७:०० वाजता फक्त झी मराठीवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.