*'विश्वमित्र' अल्बममधील टायटल सॉंगचा ट्रेलर प्रदर्शित*
January 17, 2024
0
*'विश्वमित्र' अल्बममधील टायटल सॉंगचा ट्रेलर प्रदर्शित*
'विश्वमित्र' या अल्बमबद्दल काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर अवधूत गुप्ते यांनी पोस्ट शेअर केली होती. तर आता या अल्बममधील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पहिल्या `विश्वमित्र’ या गाण्याचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून या गाण्यातून नितेश चव्हाण आणि सुवर्णा काळे यांच्या प्रेमाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. गाणे जरी रांगड्या मातीतील असले तरी या गाण्यातून दोघांची हळुवार सुरू होणारी प्रेमकहाणी दिसत आहे. त्यांची ही प्रेमाची गोष्ट येत्या १९ जानेवरीला आपल्या भेटीला येणार आहे.
एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘विश्वमित्र’ या अल्बमची निर्मिती गिरीजा गुप्ते यांनी केली आहे. `विश्वमित्र`हे गाणं अवधूत गुप्ते यांनी गायले असून या गाण्याला संगीत आणि बोलही त्यांचेच लाभले आहेत.
या गाण्याबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, "आमच्या अल्बममधील टायटल सॉंग लवकरच प्रदर्शित होणार आहे. या गाण्यातील राकड, रांगडे शब्द लोकांना भावणारे आणि आपलेसे करणारे आहे. गावाकडे सर्रास वापरले जाणारे हे बोलीभाषेतील शब्द गाण्यात एक गावरान तडका आणत आहेत. या गाण्यातून एक कथा उलगडत आहे.’’