Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सरोगसीवर भाष्य करणार 'डिलिव्हरी बॉय'*

*सरोगसीवर भाष्य करणार 'डिलिव्हरी बॉय'* 'डिलिव्हरी बॉय' या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यात काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे एक भन्नाट पोस्टर सोशल मीडियावर झळकले आणि आता प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारे एक धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. टीझरमध्ये प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप गावातील काही महिलांना 'सरोगसी'साठी तयार करताना दिसत असून यातून होणारा कल्लोळ आपल्याला चित्रपटात दिसणार आहे. आता हे दोघे गावातील महिलांना सरोगसीसाठी का तयार करत आहेत, याचे उत्तर मात्र प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे. या चित्रपटात प्रथमेश आणि पृथ्वीक बरोबर अंकिता लांडेही पाटीलही प्रमुख भूमिकेत आहे. 'डिलिव्हरी बॉय'मधून प्रथमेश परब एका वेगळ्याच लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार असून त्याचा हा नवा अंदाज चाहत्यांना नक्कीच आवडेल. हा चित्रपट सरोगसीवर भाष्य करणारा आहे, हे टीझरवरून कळतच आहे. आता हा नाद खुळा भाऊ आणि त्याचा जोडीदार गावातील महिलांना सरोगसीसाठी तयार करतो की आणखी अडचणी मागे लावून घेतो, हे बघताना प्रेक्षकांना धमाल येणार हे नक्की !
सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स निर्मित 'डिलिव्हरी बॉय' या चित्रपटाचे डेव्हिड नादर निर्माते आहेत तर फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत. मोहसीन खान दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केले आहे. मनोरंजनाची हमी देणारा हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. याबद्दल दिग्दर्शक मोहसीन खान म्हणतात, " एका संवेदनशील विषयवार या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे.चित्रपट विनोदी जरी असला तरी या नाजूक विषयांचे गांभीर्य आम्ही तितकेच जपले आहे. विनोदाच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही नात्यांची गोष्ट आहे. जी प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत पाहावी अशी आहे. आपल्या समाजात हा विषय तितकासा उघडपणे, सहजपणे बोलला जात नाही. त्यामुळे हा विषय घराघरात पोहोचावा, त्याचे महत्व पटावे, याकरता आम्ही हा चित्रपट अगदी मनोरंजनात्मकरित्या प्रेक्षकांसाठी आणला आहे.'' तर निर्माते डेव्हिड नादर म्हणतात, '' एक धमाल चित्रपट आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. प्रेक्षकांना आपल्या आसपासचे विषय पडद्यावर बघायला जास्त आवडतात. या चित्रपटात मनोरंजन आहे, विनोद आहेत, समाज प्रबोधन आहे आणि याच गोष्टी प्रेक्षकांना विशेष भावणाऱ्या आहेत. चित्रपटाचा विषय जरा वेगळा आहे. 'डिलिव्हरी बॉय'चे सादरीकरण वेगळे आहे आणि माझ्या मते हीच या चित्रपटाची खासियत आहे.''

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.