*काय होईल जेव्हा अर्जुन अप्पीला दंगलीला सामोरं जाताना बघेल ?*
January 12, 2024
0
*काय होईल जेव्हा अर्जुन अप्पीला दंगलीला सामोरं जाताना बघेल ?*
'अप्पी आमची कलेक्टर' मध्ये अप्पी आणि अर्जुन आपल्या येणाऱ्या बाळासाठी खूप उत्सुक आहेत,त्याच पाऊल ह्या जगात पडायच्या आधीच त्याच आयुष्य आनंदमयी करायची तयारी चालू आहे. हे सगळं होत असताना अर्जुनला बातमी मिळते ती साताऱ्यात दंगल सुरु झाल्याची आणि त्या दंगलीत अप्पीचा भाऊ दिप्या अडकला आहे. एका पोलीसाच कर्तव्य पार पाडण्यासाठी अर्जुन रात्रीच कामाला जायला निघतो. पण अर्जुनला अप्पीची चिंता सतावते म्हणून तो तिला ह्या परिस्थितीत घरीच थांबायला सांगतो. अप्पीला दिप्या बद्दल समजतं. त्याचवेळी सुषमा येते आणि अप्पीला सांगते की गेल्यावेळी कलेक्टरने काम केले नाही, म्हणून मी माझा मुलगा गमावला, ह्यावेळी दुसऱ्या मुलाला काही झाले नाही पाहिजे. एक कलेक्टर असून एवढ्या गंभीर परिस्तिथीत ती हातावर हाथ घेऊन घरी बसणे तिला पटत नाही. अप्पी, अर्जुन आणि घरातल्यांच्या विरोधात जाऊन दंगलीत जायचा निश्चय करते.
काय होईल जेव्हा अर्जुन अप्पीला दंगलीला सामोरं जाताना बघेल? ही कुठच्या येणाऱ्या मोठ्या वादळाची चाहूल तर नसेल? बघायला विसरू नका 'अप्पी आमची कलेक्टर' संध्या ७:०० वाजता आपल्या झी मराठी वाहिनी वर.