*निशीच्या लग्नाला उमा आणि ओवीचा शृंगार*
January 24, 2024
0
*निशीच्या लग्नाला उमा आणि ओवीचा शृंगार*
खोत कुटुंबात लग्न कार्य आहे आणि तयारी एकदम जोरात चालू आहे. उमा आणि रघुनाथच्या लाडक्या लेकीच निशीचं लग्न आहे. माहेरच्या पिवळ्या रंगाच्या साडीत निशी तयार आहे. निशी म्हणजेच दक्षता जोईल आपल्या ह्या लग्नाच्या लुकबद्दल सांगितले,"निशीच्या लग्नासाठी फक्त खोत परिवारच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र उत्सुक आहे. मला प्रवासात भेटणारे कार्यक्रमाचे चाहते विचारतायत की निशीच्या लग्नात काय होणार आहे.
त्यांची उत्सुकता पाहून आम्हा सगळ्यांना खूप आनंद मिळतो आणि काम करण्याची ऊर्जा देखील वाढते. निशीच्या लग्नाच्या लुक बद्दल जितकी प्रशंसा करू कमी आहे आमच्या क्रिएटिव्ह टीम आणि स्टायलिंग टीमनी अतिशय सुंदर काम केले आहे. मराठी मुलीचं लग्न आणि माहेरची पिवळी साडी ठरलेलीच आहे, पण त्यात आम्ही गुलाबी रंगाचे काठ देऊन त्याला एक वेगळा लुक दिला आहे. मेक-अप आणि केस आम्ही एकदम साधे पण सुंदर केले आहे. मोत्याच्या दागिन्यांनी निशीचा निरागसपणा उठून आणला आहे. कानवेल, बुगड्या हे खूप सांस्कृतिक दृष्टिकोन लक्षात घेऊन निशाला नवरीरूपात तयार केले आहे”.
मुलीचं लग्न तर आईचाही थाट तितकाच असतो, मोत्याची नथ आणि गळ्यात सोन्याचा हार आणि हातात हिरवा चुडा घालून उमा निशीच्या लग्नकार्यासाठी तयार झाली आहे. नवरीची बहीण ओवी ही निशीच्या लग्नासाठी पारंपरिकरीतीने तयार झाली आहे, जांभळ्या आणि लाल रंगाची साडी, मोत्याची नथ आणि दागिने त्यावर नाजूकशी एक टिकली लावून ओवीने लग्नकार्यमध्ये नवरीच्या बहिणीनंसाठी आणि मैत्रिणींसाठी खूप छान इन्स्पिरेशन असू शकत.
पाहायला विसरू नका ‘सारं काही तिच्यासाठी’ सोमवार ते शनिवार संध्या. ७.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.