निशीची उष्टी हळद नीरजला लागणार !
January 17, 2024
0
*निशीची उष्टी हळद नीरजला लागणार !*
श्रीनू आणि निशीच्या लग्नाची तयारी जोरावर आहे. लग्नाच्या गडबडीत नीरज आणि श्रीनूची गाठभेट होते, आणि नीरज त्याच्याकडून एक वचन घेतो की निशीला लग्नानंतर ही बॅडमिंटन खेळण्याची परवानगी असुदे. इथे उमासुद्धा श्रीनूला निशीचा खेळ चालू रहावा म्हणून विनंती करते. उमा आणि नीरजच बोलणं ऐकून श्रीनू रघुनाथकडे निशाला खेळ चालू ठेवण्याची परवानगी मागायला जातो . तर अंगणात निशी-श्रीनू हळदीचा मांडव बांधला गेला आहे आणि मांडवात हळदीचा कार्यक्रम होत असताना योगायोगाने श्रीनूची उष्टी हळद ओवीला लागते आणि निशीला लागलेली हळद नीरजला लागते.
आता रघुनाथ निशीला लग्नानंतर हे खेळ सुरु ठेवण्याची परवानगी देईल का? एकमेकांची उष्टी हळद लागलेली पाहून ओवी-निशी आणि श्रीनू-नीरजच्या निर्णयात काही बदल होईल का? ओवी, खरच देश सोडून जाईल का?
ह्या सर्व प्रशनांची उत्तरे दडली आहेत 'सारं काही तिच्यासाठी' च्या येणाऱ्या भागांमध्ये सोमवार ते शनिवार संध्या. ७:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.