‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटाच्या नवीन पोस्टरने वेधले प्रेक्षकांचे लक्ष
January 18, 2024
0
*‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटाच्या नवीन पोस्टरने वेधले प्रेक्षकांचे लक्ष*
मोहसीन खान दिग्दर्शित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे एक नवीन गंमतीशीर पोस्टर आपल्या भेटीला आले आहे. पोस्टरमध्ये प्रथमेश परबच्या हातातील गिफ्टबॉक्समध्ये एक गोंडस बाळ दिसत आहे. त्याच्या बाजूला पृथ्विक प्रताप आणि डॅाक्टरच्या वेषात अंकिता लांडे पाटीलही दिसत आहे. त्यामुळे आता प्रथमेश या बाळांची डिलिव्हरी करणार का, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना ९ फेब्रुवारीला मिळणार आहे.
सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन निर्मित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे डेव्हिड नादर निर्माते आहेत तर फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केले आहे.
दिग्दर्शक मोहसीन खान म्हणतात, " या चित्रपटातून एक वेगळा विषय मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सरोगसीसारख्या नाजूक विषयावर भाष्य करणाऱ्या आमच्या या चित्रपटातून प्रेक्षकांना संदेश देण्याचा एक प्रयत्न आहे. मात्र हे करताना या विषयाचे गांभीर्य जपत आम्ही त्याला विनोदाची साथ दिली आहे.’’