काय आहे शिवाच - सलमान कनेक्शन ?
January 20, 2024
0
*काय आहे शिवाच - सलमान कनेक्शन ?*
झी मराठीवर लवकरच 'शिवा' तुमच्या भेटीला येत आहे. शिवाचा पहिला प्रोमो लोकांसमोर आला आणि चर्चेला विषय मिळाला. मग तो शिवाचा लुक असो किंवा तिचा बिनधास्त स्वभाव लोकांना सगळंच आकर्षित करत होत. जेव्हा 'शिवा' ला म्हणजेच पूर्वा कौशिकला विचारलं गेलं की तिला या भूमिकेसाठी कसा प्रतिसाद मिळतोय तर ऐका ती काय म्हणतेय, "जेव्हा माझी या भूमिकेसाठी निवड झाली आणि वर्कशॉप सुरु झालं होते तेव्हा मी कोणालाच सांगितले नव्हतं, म्हणून पहिला प्रोमो जेव्हा माझ्या परिवाराने आणि मित्रानी पाहिला तेव्हा ते प्रचंड खुश झाले. मला हे आवर्जून सगळ्यांना सांगायचे आहे की मला सलमान खान लहानपणापासून खूप आवडतो.
सलमान खानच्या वाढदिवसाच्या दिवशी 'शिवा' चा पहिला लुक लोकांसमोर आला आणि माझ्या वाढदिवसाच्या दिवशी 'शिवा' चा प्रोमो रिलीझ झाला ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मला काही लोक येऊन बोलले सुद्धा की 'शिवा' मध्ये 'वॉन्टेड' फिल्मचा सलमान खान दिसून येतोय. असं पात्र जे मराठीत कदाचितच बघायला मिळालं असेल जे शिवाच्या रूपात सगळ्यांना बघायला मिळेल. कधी सलमान खानशी भेटायची संधी नाही मिळाली पण आयुष्यात नक्कीच कधीतरी गाठभेट होईल. लवकरच भेटायला येतेय झी मराठीवर.