आदर्श शिंदे यांच्या आवाजात दमदार गाणं 'प्रभू श्रीराम'
January 12, 2024
0
*आदर्श शिंदे यांच्या आवाजात दमदार गाणं 'प्रभू श्रीराम'*
*श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सप्तसूर म्युझिकतर्फे खास म्युझिक व्हिडिओची निर्मिती*
अयोध्या येथील प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचे 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे. त्यामुळे अवघा देश श्रीराममय झाला आहे. श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या औचित्याने प्रभू श्रीराम या म्युझिक व्हिडिओची निर्मिती करण्यात आली असून, आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजातील हा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर हा लाँच करण्यात आला आहे.
प्रभू श्रीराम या म्युझिक व्हिडिओची निर्मिती सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांनी केली आहे.या गाण्याची संकल्पना साईनाथ राजाध्यक्ष यांची आहे.विपुल शिवलकर यांच्या गीताला ऋषी बी. यांनी संगीतबद्ध केलं आहे. अयोध्येचा राजा आपला राम मंदिरी अवतरला आता असे या गाण्याचे शब्द आहेत. या गाण्याला असलेलं संगीत प्रत्येक रामभक्ताला उत्साह देणारं आहे.
ग्राफिक्सचा उत्तम वापर करून या गाण्याचा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. त्यात भावभक्तीने ओथंबलेले श्रीराम भक्त, शरयू तीरावरील आरती, श्रीराम मंदिराची दृश्ये दाखवण्यात आली आहेत. त्यामुळे अवघा देश श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या भव्यदिव्य सोहळ्याकडे डोळे लावून बसलेला असताना आता या प्रभू श्रीराम या गाण्यामुळे रामभक्तांच्या उत्साहाला नक्कीच उधाण येणार आहे.
*Song Link*
https://youtu.be/2CiPNcuVqsI?si=ITc36GY3sP9sd_U8
Thanks & Regards