अधिपतीच्या रागने उद्वस्त होईल का अक्षर-अधिपतीचा संसार ?*
January 15, 2024
0
*अधिपतीच्या रागने उद्वस्त होईल का अक्षर-अधिपतीचा संसार ?*
'तुला शिकवीन चांगलाच धडा' मध्ये अक्षरा आणि भुवनेश्वरीची लढाई एका वेगळ्या वळणावर पोहचली आहे. भुवनेश्वरीच सगळ्यात मोठं सत्य अक्षरा समोर आलं आहे. भुवनेश्वरी, अधिपतीची खरी आई नाही हे सत्य ती अधिपतीला सांगायला जाते. अक्षरा सत्य सांगताना भुवनेश्वरीच्या अनेक गोष्टी अधिपती समोर आणते, हे सगळं अधिपती शांतपणे ऐकून घेतो. अक्षरा त्याला पटवून देते की कसं भुवनेश्वरी तुम्हाला अधोगतीकडे ढकलत आहे. आई बद्दल इतकं ऐकल्यावर अधिपतीचा पारा चढतो आणि तो अक्षरावर हात उचलतो. पहिल्यांदाच अक्षरा आणि अधिपती मध्ये वाद इतक्या टोकेला पोहचतो. अक्षरा, अधिपतीच वागणं पाहून अधिपतीला सोडून जाईल का? अधिपती समोर भुवनेश्वरीच सत्य समोर आणण्याचा ध्यास अक्षरा सोडून देईल का ?
ह्या सर्व प्रश्नांचं उत्तरासाठी पाहायला विसरू नका 'तुला शिकवीन चांगलाच धडा' सोमवार ते शनिवार रात्री ८:०० वाजता फक्त झी मराठी वाहिनी वर.