Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*२०२४ च स्वागत परिवार आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात होणार*

*२०२४ च स्वागत परिवार आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात होणार*
नवीन वर्षची सुरवात आपल्या माणसं सोबत आणि देवाच्या आशीर्वादाने होईल या हुन चांगली गोष्ट काय असू शकते. झी मराठीचे कलाकार २०२४ च स्वागत नवीन वर्ष कसे साजरा करणार आहेत ह्या बाबती उत्साह व्यक्त करताना सांगितले.
'सारं काही तिच्यासाठी' मधली उमा खोत म्हणजेच खुशबू तावडेनि सांगितले, "मी २०२४ चे स्वागत आमच्या नवीन घरात ,माझ्या पूर्ण परिवार सोबत साजरा करणार आहे. घरात आवडते पदार्थ बनवून, छान बोर्ड गेम खेळू, त्या सोबत गप्पा गोष्टी २०२३ चे आठवणींना उजाळा देऊन आणि नवीन वर्षात काय- काय करायचे आहे त्या बदल भरपूर चर्चा करणार.
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मधली श्वेत मेहेंदळे म्हणजेच इंद्राणी आपले जिवलग मित्र यश प्रधान,अपेक्षा चोक्सी आणि आपल्या परिवार सोबत नवीन वर्षाचं स्वागत करणार आहे. मी आणि माझा परिवार पुण्याला जाणार आहोत यशच्या घरी. त्याची बायको अपेक्षा हिने नवीन कार घेतली आहे आणि ती आम्हाला फिरवणार आहे. आम्ही पुण्याच्या जवळपास वेगवेगळ्या जागा फिरणार आहोत. मढेघाट, पाबेघाट अश्या वेगवेगळ्या सुंदर जागांना शोधून एक्सप्लोर करण्याचा आमचा प्लॅन आहे.
'अप्पी आमची कलेक्टर' मधला तुम्हा सर्वांचा लाडका अर्जुन म्हणजे रोहित परशुरामने सांगितले कि, मी नवीन वर्षाचं स्वागत पत्नी पूजा आणि लेकी सोबत करणार आहे. आम्ही दर वर्षी ३१ डिसेंबरला कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी जातो. नवीन वर्षाचं आगमन महालक्ष्मीच्या दर्शनाने आणि तिच्या आशीर्वादने सुरु करणार इतकं सुख कशातच नाही फक्त ह्या वर्षी आमच्या सोबत आमचं पिलू म्हणजे माझी लाडकी लेक रुई असणार तुमच्या ह्या लाडक्या कलाकारांना नवीन वर्षात ही प्रेम देत राहा आणि बघत रहा 'सारं काही तिच्यासाठी' संध्याकाळी ७:३० वाजता, 'अप्पी आमची कलेक्टर' संध्या ६:३० वाजता आणि 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' रात्री १०:३० वाजता

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.