प्राईम व्हीडिओ’च्या वतीने त्यांचा आगामी हिंदी ओरिजनल सिनेमा ड्राय डे ‘च्या ग्लोबल प्रीमियरची घोषणा,
December 12, 2023
0
प्राईम व्हीडिओ’च्या वतीने त्यांचा आगामी हिंदी ओरिजनल सिनेमा ड्राय डे ‘च्या ग्लोबल प्रीमियरची घोषणा, जितेंद्र कुमार आणि श्रीया पिळगांवकर मुख्य भूमिकेत झळकणार, 22 डिसेंबर रोजी प्रदर्शित
सौरभ शुक्ला आणि इमे एंटरटेनमेंट निर्मित ड्राय डे’मध्ये अन्नू कपूर महत्त्वपूर्ण भूमिकेत
मुंबई. -— प्राईम व्हीडिओ हे भारताचे सर्वात पसंतीचे मनोरंजन ठिकाण असून आज त्यांच्या आगामी अॅमेझॉन ओरिजनल मुव्ही, ड्राय डे ‘ची घोषणा करण्यात आली. या सिनेमाचे कथानक देशाचे हृदय मानल्या जाणाऱ्या राज्यातील एका गावात फुलते, विनोद-नाट्यमय कथेत काही काळ गुंडगिरीत असणाऱ्या गन्नू या प्रमुख पात्राचा यंत्रणेविरुद्धचा प्रवास उलगडत जातो. हे पात्र अभिनेता जितेंद्र कुमार याने साकारले आहे. आपल्या जिवलगांचा विश्वास आणि प्रेम संपादित करण्याच्या भावनिक शोधात गन्नूला बाह्य आव्हाने झेलावी लागतात, शिवाय त्यांच्या स्वत:च्या असुरक्षितता आणि दारूच्या व्यसनाशी संघर्ष असतो. सौरभ शुक्ला (Saurabh Shukla) दिग्दर्शित आणि मोनिषा अडवाणी (Monisha Advani), मधू भोजवानी (Madhu Bhojwani), निखिल अडवाणी (Nikkhil Advani) निर्मित या सिनेमात जितेंद्र कुमार (Jitendra Kumar), श्रीया पिळगांवकर (Shriya Pilgaonkar) आणि अन्नू कपूर (Annu Kapoor) मुख्य भूमिकेत झळकतील. तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेतील डब आवृत्तींसह 22 डिसेंबर रोजी भारतात आणि जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्राईम व्हीडिओवर ड्राय डेचा प्रीमियर होईल. हा सिनेमा प्राईम मेंबरशीपमध्ये नवीनतम भर आहे. भारतातील प्राईम सदस्य फक्त ₹ 1499/ वार्षिक एकल सदस्यत्वामध्ये बचत, सुविधा आणि मनोरंजनाचा आनंद घेऊ शकतात.
“आम्ही अस्सल आणि आमच्या संस्कृतीत खोलवर रुजलेल्या कथा भारत तसेच बाहेरील विविध प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समर्पित आहोत. ड्राय डे हा आपल्या या बांधिलकीचा पुरावा आहे. भारतातील एका छोट्याशा शहरात घडणारी एका सदोष नायकाभोवती फिरणारी ही नवीन कथा, एका आकर्षक कथानकाद्वारे सामाजिक विचार करायला लावणारी कथा विणते. हा सिनेमा म्हणजे वैविध्यपूर्ण कथा मसाला आणि विलक्षण बारकावे यांचे मिश्रण आहे,” अशा शब्दांत प्राईम व्हिडिओ, इंडिया ओरिजिनल्सच्या प्रमुख अपर्णा पुरोहित यांनी मनोगत व्यक्त केले. "इमे एंटरटेनमेंट सोबतचा आमचा प्रवास अत्यंत लाभदायक ठरला आहे आणि मला विश्वास आहे की ड्राय डे या आमच्या पाचव्या एकत्रित कलाकृतीला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम आणि कौतुक मिळेल."
“प्राईम व्हीडिओसह हिंदी ओरिजनल मुव्ही’च्या परिघात ड्राय डे नवीन प्रवासाचा शुभारंभ ठरणार आहे”, असे इमे एंटरटेनमेंटचे निर्माता निखिल अडवाणी यांनी सांगितले. “हा सिनेमा सामाजिक व्यंगावर खेळकर अंगाने करुणा-विनोदी पद्धतीने भरपूर भावभावना-नाट्याचे दर्शन घडविणार आहे. ड्राय डे दारूच्या व्यसनावर महत्त्वपूर्ण आणि समर्पक संदेश देतो. अशास्वरुपाचा सिनेमा मला करायला मिळाला हे माझे भाग्य आहे. मुंबई डायरीज ‘च्या तुफान यशानंतर दरम्यानच्या काळात प्राईम व्हीडीओसोबतचे आमचे संबंध अधिक सशक्त होत आहेत. या अर्थवाही कलाकृतीला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावे लागेल.”