थाटात पार पडणार मुक्ता-सागरचा विवाहसोहळा
December 21, 2023
0
विवाहसोहळ्यासाठी ठरलं तर मग मालिकेतल्या अर्जुन-सायलीची खास हजेरी
हो नाही म्हणता म्हणता अखेर मुक्ता आणि सागर लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. खरतर दोघांचे स्वभाव भिन्न असले तरी या दोघांना जोडणारा एकमेव धागा म्हणजे सई. सईवरच्या प्रेमापोटी या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लवकरच तो पूर्णत्वासही जाणार आहे. गोखले कुटुंबाच्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न पार पडणार असणार असलं तरी या लग्नात कोळी ठसकाही असणार आहे. लग्न मंडपात वाजत-गाजत सागर आणि त्याच्या कुटुंबाचं आगमन होणार आहे. संपूर्ण कुटुंब कोळी पेहरावात दिसणार आहे. त्यामुळे लग्नात खऱ्या अर्थाने मुक्ता-सागर सोबतच दोन कुटुंबही नव्या नात्यात बांधली जाणार आहेत.
मुक्ता-सागरच्या लग्नासाठी ठरलं तर मग मालिकेतले अर्जुन-सायली लावली खास हजेरी लावणार आहेत. यासोबतच लग्नात सावनीची देखिल एण्ट्री होणार आहे. सावनीच्या येण्याने बरंच नाट्यही रंगणार आहे. त्यामुळे लग्न निर्विध्नपणे पार पडणार का? याची उत्सुकता नक्कीच असेल. तेव्हा मुक्ता आणि सागरच्या लग्नाला नक्की यायचं हं. पहायला विसरु नका विवाह विशेष प्रेमाची गोष्ट रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.