*‘स्टार प्लस’च्या ‘डान्स प्लस’ या रिअॅलिटी शोचा सातवा सीझन पारंपरिक, आकर्षक रूपात प्रेक्षकांच्या भेटीला!*
December 10, 2023
0
*‘स्टार प्लस’च्या ‘डान्स प्लस’ या रिअॅलिटी शोचा सातवा सीझन पारंपरिक, आकर्षक रूपात प्रेक्षकांच्या भेटीला!*
_१६ डिसेंबरपासून ‘स्टार प्लस’वर शनिवारी आणि रविवारी संध्याकाळी ६ वाजता होणार प्रसारित_
https://www.instagram.com/reel/C0OaHv8MgXj/?igshid=MzRlODBiNWFlZA==
आठ वर्षांपूर्वी ‘डान्स प्लस’ सुरू झाल्यापासून, देशात सर्वाधिक वाखाणल्या गेलेल्या आणि प्रेक्षकांचे उदंड प्रेम लाभलेल्या नृत्याच्या ‘रिअॅलिटी शो’पैकी एक म्हणून या कार्यक्रमाने विशेष स्थान संपादन केले आहे. आता, हा दर्जेदार रिअॅलिटी शो सातव्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीकरता सज्ज झाला आहे. नृत्याचे अनोखे आविष्कार सादर करणाऱ्या आणि प्रेक्षकांना सहभागी करून घेण्याची उत्तम शैली संपादन केलेल्या या कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी रसिकांमध्ये पुन्हा एकवार उत्साह संचारला आहे.
रेमो डिसूझा आणि शक्ती मोहन, पुनित पाठक व राहुल शेट्टी या इतर कॅप्टन्सच्या सौहार्दपूर्ण संबंधांमुळे, ‘डान्स प्लस’ हा रिअॅलिटी शो आता प्रेक्षकांना दूरचित्रवाणी संचावर खिळवून ठेवण्याचा वारसा कायम ठेवण्यास सज्ज आहे.
या वर्षी ‘डान्स प्लस’च्या नव्या सीझनमधून भारतीय पारंपरिक नृत्य प्रकारातील अस्सल बारकावे प्रेक्षकांपुढे सादर होतील. नवीन ‘प्रोमो’सह सुरू होणाऱ्या नव्या सीझनमध्ये, मायकेल जॅक्सनला अनोखी श्रद्धांजली अर्पण करून, स्थानिक तसेच भारतीय संस्कृतीशी सुसंगतता आणण्याचे अनोखे उद्दिष्ट ‘डान्स प्लस’ रिअॅलिटी शो बाळगले आहे.
अनोख्या कार्यक्रमांचे सादरीकरण करण्याचा ‘स्टार प्लस’चा वारसा पुढे सुरू ठेवणाऱ्या ‘डान्स प्लस’ या रिअॅलिटी शोमध्ये यापूर्वी कधीही न पाहिलेल्या रोमांचकारी, थरारक नृत्याविष्कार बघण्यासाठी सज्ज राहा. तुम्हा सर्वांप्रमाणेच आम्हीही प्रेक्षकांना सहभागी करून घेणाऱ्या ‘डान्स प्लस’ या रिअॅलिटी शोची आतुरतेने वाट पाहत आहोत. १६ डिसेंबरपासून ‘स्टार प्लस’वर शनिवारी आणि रविवारी संध्याकाळी ६ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. हा कार्यक्रम ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर उपलब्ध असेल.