नागराज मंजुळे दिग्दर्शित "खाशाबा" या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणास आजपासून सुरूवात!*
December 01, 2023
0
*जिओ स्टुडिओजची मोठी घोषणा - नागराज मंजुळे दिग्दर्शित "खाशाबा" या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणास आजपासून सुरूवात!*
Subtittle - *भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक विजेत्याची न ऐकलेली कहाणी - खाशाबा*
मुंबई, 1 डिसेंबर 2023 - जिओ स्टुडिओज आणि आटपाट निर्मित आगामी मराठी चित्रपट खाशाबाचे चित्रीकरण सुरू झाल्याची घोषणा केली आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे या बायोपिकचे दिग्दर्शन करत आहेत. 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचे ऐतिहासिक पदक जिंकणाऱ्या आणि स्वतंत्र भारतामध्ये वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे पहिले भारतीय कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाच्या हा प्रयत्न आहे.
मराठी मातीतील विस्मृतीत गेलेल्या एका झुंजार नायकाचा असाधारण जीवनप्रवास खाशाबा चित्रपटाच्या निमित्ताने मांडला जाणार आहे.
या निमित्ताने नागराज मंजुळे म्हणाले की,
‘सैराटनंतर ही माझी तिसरी मराठी फिल्म आहे. जिओ स्टुडिओज सोबत या महत्वाकांक्षी निर्मितीसाठी आम्ही सज्ज आहोत. मागच्या तीन वर्षांपासून आम्ही 'खाशाबा'ची तयारी करत आहोत. आज याच चित्रीकरण सुरू होत आहे याचा मला आनंद आहे.’
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे, गार्गी कुलकर्णी आणि आटपाट निर्मित, नागराज पोपटराव मंजुळेद्वारा दिग्दर्शित ‘खाशाबा’ 2025 मध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.